दिल्ली मुंडका आग प्रकरण : इमारतीच्‍या मालकाला अटक | पुढारी

दिल्ली मुंडका आग प्रकरण : इमारतीच्‍या मालकाला अटक

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील मुंडका येथे दोन दिवसांपूर्वी एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला होता. या इमारतीच्या फरार मालकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून रविवारी देण्यात आली. मुंडका येथील आगीच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी २१ महिला होत्या.

चार मजली इमारतीचे पहिले दोन मजले आगीत पूर्णपणे जळून खाक झाले होते. इमारतीचा मालक मनीष लखरा याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ठिकठिकाणी छापे टाकले होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली. लखरा हा मुंडका गावचा रहिवासी आहे. आग दुर्घटनेनंतर अजूनही १९ लोक बेपत्ता असून ते जीवित असण्याची शक्यता मावळत चालली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button