माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन | पुढारी

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. ४ मे रोजी त्‍यांना हृदयविकाराचा झटका आला  होता. गेली काही दिवस यांच्‍यावर दिल्‍लीतील एम्‍समध्‍ये उपचार सुरु होते. याच्‍या निधनाची माहिती त्‍यांचे नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुकच्‍या माध्‍यमातून दिली. त्‍यांनी आपल्‍या आजोबासोबतचा एक फोटोही फेसबुवर शेअर केला आहे. आज सकाळी ११ वाजता त्‍यांच्‍या पार्थिवावर मंडी शहरात अंत्‍यसंस्‍कार हाेणार आहेत.

सुखराम यांच्‍या राजकीय कारकीर्दीची सुरुवात हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून झाली. १९६३ ते १९८४ या काळात ते मंडी मतदारसंघाचे आमदार होते. यानंतर १९८४मध्‍ये मंडी लोकसभा मतदारसंघातूनच ते खासदार झाले.  १९९१ मध्‍ये ते दूरसंचार मंत्री झाले. १९९६ मध्‍ये त्‍यांनी पुन्‍हा एकदा लोकसभा निवडणूक जिंकली होती. सध्‍या त्‍याचे पुत्र अनिल शर्मा हे मंडी मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.

भ्रष्‍टाचारप्रकरणी झाली होती पाच वर्षांची शिक्षा

पंडित सुखराम शर्मा हे १९९३-९६ या काळात केंद्रीय मंत्री होते. १९९६ मध्‍ये देशभरात गाजलेल्‍या टेलिकॉम घोटाळ्यात त्‍यांच्‍यावर आरोप लावण्‍यात आले होते. सुखराम यांचे नाव टेलकॉम घोटाळ्यात आले होते. यानंतर त्‍यांची काँग्रेसमधून हकालपट्‍टी करण्‍यात आली होती. याप्रकरणी त्‍यांनी २०११ मध्‍ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली होती.

काँग्रेसमधून हकालपट्‍टी झाल्‍यानंतर सुखराम यांनी हिमाचल विकास पार्टी स्‍थापन केली होती. यानंतर त्‍यांनी भाजपबरोबर युती करत सरकारमध्‍ये सहभागी झाली. २०१७ विधानसभा निवडणुकीत सुखराम यांनी पुत्र अनिल शर्मा व नातू आश्रय शर्मा यांच्‍याबरोबर भाजपमध्‍ये प्रवेश केला होता. मात्र २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी सुखराम व आश्रय यांनी पुन्‍हा एकदा काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला होता. आश्रय शर्मा यांनी लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्‍यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सुखराम यांचा नातू आयुष शर्मा हा अभिनेता असून त्‍याने अभिनेता सलमान खान याची बहिणी अर्पिताशी विवाह केला आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

 

Back to top button