Cyclone Asani : ‘असनी’ इफेक्‍ट : ‘या’ राज्‍यांमध्‍ये मुसळधार पावसाचा अंदाज | पुढारी

Cyclone Asani : 'असनी' इफेक्‍ट : 'या' राज्‍यांमध्‍ये मुसळधार पावसाचा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

नैऋत्‍य हिंदी महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्‍याने असनी चक्रीवादळाची ( Cyclone Asani ) व्‍याप्‍ती आता बांगलादेश आणि म्‍यानमारच्‍या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहचले आहे. त्‍यामुळे आग्‍नेय बंगलाचा उपसागर व लगतच्‍या दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍या तयार झालेल्‍या कमी दाबाच्‍या क्षेत्रामुळे पुढील २४ तासांमध्‍ये पूर्व मध्‍य बंगालच्‍या उपसागरात असनी चक्रीवादळ धडकेल. यामुळे पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने आज सकाळी व्‍यक्‍त केला.

Jahangirpuri violence : जहांगीरपुरी हिंसाचाराचा मास्टरमाईंड तबरेज उर्फ चिठ्ठा अटकेत

Cyclone Asani : मच्‍छिमारांना सतर्कतेचा इशारा

चक्रीवादळाला श्रीलंकेने ‘असनी’ असे नाव दिले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्‍ये आग्‍नेय बंगालचा उपसागर व दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. किनार्‍यावरील जिल्‍हे, पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकाता तसेच राज्‍यातील दक्षिणेकडील काही परिसर, आंध्र प्रदेशमधील उत्तरेकडील भाग, ओडिशा आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा इशारा देण्‍यात आला आहे. दरम्‍यान, या भागात मच्‍छिमारांना समुद्रात न जाण्‍याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा  :

 

Back to top button