

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी झालेल्या हिंसाचारातील मास्टरमाईंड तबरेज उर्फ चिठ्ठा पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंसाचारानंतर (Jahangirpuri violence) निघालेल्या शांतता आणि तिरंगा यात्रेत तो अग्रक्रमाने सहभागी झाल्याचेही उघडकीस आले आहे.
हिंसाचारानंतर (Jahangirpuri violence) तबरेज जहांगीरपुरी परिसरात पोलिसांसोबतच फिरत होता, मात्र त्यावेळी त्याला पोलिस ओळखू शकले नव्हते, याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या तबरेजला अखेर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. हिंसेनंतर जहांगीरपुरीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत तबरेज सर्वात आघाडीवर होता. पोलिसांसोबत लोकांत जाऊन त्यांना शांततेचे आवाहनही दंगलखोर तबरेज करीत असल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी तबरेजसोबत अन्य दोन आरोपींना अटक केली असून अनाबुल आणि जलील अशी त्यांची नावे आहेत. जहांगीरपुरीमध्ये झालेल्या दगडफेकीत तबरेज खूप सक्रिय होता, इतकेच नव्हे, तर पोलीस उपायुक्त उषा रंगराणी यांच्या पत्रकार परिषदेवेळी तो उपायुक्तांच्या बरोबर शेजारच्या खुर्चीवर बसला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना झालेल्या दिल्ली दंगलीतही मुख्य आरोपी म्हणून तबरेजचे नाव आले आहे.
हेही वाचलंत का ?