ज्याला आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळेस शौचास होते किंवा ज्याचे मल खूप कठीण स्वरूपाचे असून मलविसर्जनास अतिशय त्रास होतो किंवा शौचास खूप जोर लावावा लागतो (कुंथणे) किंवा मल विसर्जन पूर्ण न झाल्याची अनुभूती (मल विसर्जन संतुष्टी नाही) अशा लोकांना आपण बद्धकोष्ठता त्रास आहे, असे म्हणू शकतो.
बरेचदा काही लोकांना एक दिवस आड शौचास होते व त्याचा काहीही त्रास होत नाही. व्यवस्थित हलके झाल्याची अनुभूती होते त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणू शकत नाही. ही प्रत्येकाची वैयक्तिक प्रकृती असते.
मूळव्याधाचा त्रास होणे, पोटदुखी, पोट फुगणे, भूक न लागणे, मुखदुर्गंधी, चेहर्यावर मुरूम येणे, स्थुलत्व वाढणे, सतत चीडचीड होणे, कामात लक्ष न लागणे, निरुत्साही वाटणे इत्यादी.
अनुचित आहार म्हणजे आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश न करणे – तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात कडधान्यांपासून व त्यांच्या कोंड्यापासून.
हिरव्या पालेभाज्या, रसाळ फळे, फळभाज्या जसे कच्ची काकडी, गाजर इत्यादीपासून. तंतुमय पदार्थामुळे शरीरात मल जमा राहत नाही व शौचास साफ होते.
शरीराच्या गरजेनुसार पाणी न पिणे, शारीरिक व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, अॅलोपॅथिक औषधे (कॅल्शियम आणि लोह इत्यादी वाढवणारी औषधे इ.)
– रोजच्या जेवणामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश, जेवणाच्या वेळा नियमित पाळणे, आहारात हंगामी फळे व भाज्यांचा समावेश करणे.
– शरीराच्या गरजेनुसार व ऋतूनुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल, रोज १ तास शारीरिक व्यायाम, योगासने करणे.
– जंकफूड, मैद्याचे पदार्थ, प्रिझरवेटिव्ह घातलेले अन्न, सतत बैठे काम, शौचास आल्यास तेव्हाच्या तेव्हा न जाणे.
– जेवणाच्या अनियमित वेळा व प्रमाण, मांसाहार, धूम्रपान, मध्यपान इ. चा अतिरेक.
वरील सर्व गोष्टी करूनसुद्धा बद्धकोष्ठता कमी होत नसेल, तर होमिओपॅथिक औषधे नक्कीच फायद्याची ठरतील.
होमियोपॅथीही एक अशी औषधी पद्धत आहे जिथे माणसाचा पूर्ण अभ्यास करून (शारीरिक व मानसिक) औषध दिले जाते. जेव्हा शरीरात काही बिघाड होतो, तो बिघाड बाहेर दाखवण्याची प्रत्येक शरीराची पद्धत वेगळी असते. ज्या पद्धतीने शरीर लक्षणे दाखवते त्या लक्षणांवरून औषध सुचवले जाते. होमिओपॅथीमध्ये बद्धकोष्ठतेसाठी काही औषधे आहेत, जी हमखास काम करतात; पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
जी माणसे खूप चीडचीड करतात, जी सतत मादक व उत्तेजक गोष्टींचे सेवन करून स्वत:ला बौद्धिक कामात मग्न ठेवतात, शारीरिक हालचाल खूप कमी करतात, ज्या माणसांना सतत शौच न झाल्याने डोकेदुखीचा त्रास होतो या लोकांसाठी हे औषध खूप उपयुक्त ठरते.
ज्या माणसांची उष्ण प्रकृती असते, सडपातळ बांध्याचे असतात, ज्यांना तहान खूप उशिरा लागते; पण तहान लागली की, मात्र एकाच वेळी खूप पाणी हवं असतं, ज्यांना भविष्याची भीती वाटत राहते, ज्यांना एकटं राहायला आवडते, जे निराशावादी असतात, ज्यांना सतत वाटत राहते आपला आजार कधीच बरा होणार नाही, जे सतत चिंताग्रस्त असतात, जे सहज घाबरणारे असतात, ज्यांना शौचाची इच्छाच होत नाही, ज्यांना अगदी कठीण स्वरूपाची अगदी कोरडी, जळाल्यासारखे शौचास होते, ज्याचे आजार किंवा व्याधी उष्ण वातावरणात किंवा कोरड्या वातावरणात गेल्यास वाढते त्यांना ते औषध खूप उपयोगाचे ठरते.
जी माणसे भित्री असतात, विसराळू असतात, छोट्या-छोट्या विनामूल्य गोष्टींचा खूप विचार करत बसतात, हट्टी असतात, सतत गोंधळलेली असतात, ज्याना मांसाहाराचा तिरस्कार असतो; पण अंडी व गोड पदार्थांची इच्छा असते, जे शरीराने जाड गुबगुबीत असतात, ज्यांना शौचाच्या सुरुवातीचा भाग खूप कडक व त्रासदायक असतो व नंतरचा भाग खूप मऊ साफ होतो व अशा लोकांना बद्धकोष्ठता असतानाच चांगली वाटते, अशा लोकांना हे औषध फायद्याचे ठरते.
ज्या व्यक्ती उत्साहहीन असतात, ज्यांना वेळ खूप हळू जातो, असे वाटत राहते, ज्यांचे मूड सतत बदलत राहतात, ज्यांना सतत गडबड असते, ज्यांना शौचास जाण्याची इच्छाच होत नाही, शौच मृदू असले तरीही खूप कुंथावे लागते, वृद्धांमध्ये शारीरिक हालचाल कमी असलेल्या स्त्रियांमध्ये, गर्भवती स्त्रियांमध्ये, बॉटलने दूध पिणार्या बालकांमध्ये या औषधाचा विचार केला जाऊ शकतो.
होमिओपॅथीमध्ये बद्धकोष्ठतेसाठी अजून बरीच औषधे आहेत जसे सेपीया, ओपियम, लायकोपोडियम, ग्रेफायटिस, सलॅफर, स्टॅफिसॅग्रीया इत्यादी. तुम्हाला बद्धकोष्ठता असेल, तर होमिओपॅथिक डॉक्टरांची व होमिओपॅथिक औषधांची नेहमी मदत घ्यावी.