हिपॅटायटिस आणि उपचार | पुढारी

हिपॅटायटिस आणि उपचार

थकवा, मळमळ, उलट्या होणे, भूक न लागणे, त्वचा पिवळसर होणे, गडद रंगाची लघवी यासारखी लक्षणे हिपॅटायटिस असल्याचे दर्शवितात. एकदा आपल्याला ही लक्षणे दिसल्यास आपण त्वरित डॉक्टरकडे जावे. उपचारास विलंब झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

हिपॅटायटिस हा सायलेंट किलर ठरतो, याची बर्‍याच लोकांना कल्पनाही नसते. हिपॅटायटिस विषाणू यकृतामध्ये दाह निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो.

हिपॅटायटिसचे पाच प्रकार – ए, बी, सी, डी आणि ई आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती दूषित अन्नाचे सेवन करत असेल किंवा दूषित पाण्याचा वापर करते तेव्हा त्या व्यक्तीला हिपॅटायटिस ए ची लागण होऊ शकते.

हिपॅटायटिस बी आणि सी वीर्य, योनीतून येणारा द्रव आणि रक्ताच्या संसर्गामुळे होतो आणि प्रसूतीदरम्यान आईकडून नवजात मुलाकडे जाते.

निर्जंतुकीकरण न केलेल्या सुयांचा वापर करणे आणि असुरक्षित संभोग केल्याने हिपॅटायटिस बी आणि सी होण्याचा धोका उद्भवतो.

शारीरिक संसर्गामुळे हिपॅटायटिस डीदेखील होऊ शकते.

हिपॅटायटिस ई विष्ठेद्वारा देखील संक्रमित होऊ शकतो किंवा आपण पीत असलेले पाणी अथवा अन्न पीडित व्यक्तीच्या मलाशी संपर्कात आल्यासही संक्रमण होऊ शकते.

हिपॅटायटिसची लक्षणे

थकवा, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे, लघवी होणे, सांधेदुखी, त्वचा पिवळसर होणे ही काही सामान्यत: दिसणारी लक्षणे आहेत.

एकदा लक्षणे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला आणखी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. असे न करणे आपल्यासाठी जीवघेणे ठरू शकते.

हिपॅटायटिसवर वेळीच मात करण्यासाठी वेळेवर निदान आणि उपचार आवश्यक आहेत.

हिपॅटायटिसग्रस्त लोकांना या आजाराच्या दुष्परिणामांविषयी माहिती नसते. बहुतेक लोकांना हिपॅटायटिस बी आणि सीमध्ये कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत आणि नकळत इतरांना व्हायरस पसरवू शकतात.

एखाद्याचे संपूर्ण मूल्यांकन हे वेळीच तपासणी आणि त्वरित उपचार करण्यास मदत करते आणि यकृत रोगाने ग्रस्त सिरोसिस, हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा आणि रोगाशी निगडित मृत्यूशी संबंधित अनेक स्थितीत होणारी वाढ थांबवते.

हिपॅटायटिस यकृताच्या कार्यात व्यत्यय आणून कायमचे नुकसान करू शकते.

रक्त चाचणी, यकृताची बायोप्सी आणि यकृत अल्ट्रासाऊंडसारख्या विविध चाचण्या घेतल्या जातात. ज्यामुळे हिपॅटायटिसची लक्षणे दिसून येतात.

योग्य निदानानंतर, औषधोपचाराच्या स्वरूपात उपचार लिहून दिले जाऊ शकतात. परंतु, तुमचे यकृत कायमचे खराब झाले असेल, तर तुम्हाला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते.

आपल्या शरीरात होणारे कोणतेही असामान्य बदल त्वरित डॉक्टरांना सांगावे. असे केल्याने आपले यकृत गंभीर नुकसान होण्यापासून वाचू शकते.

हिपॅटायटिसचे ए आणि बी ची लस रोगाचा सामना करण्यास मदत करू शकते. तथापि, ही लस शरीरात आधीच विकसित झालेल्या सक्रिय संसर्गावर उपचार करणार नाही, हेही लक्षात घ्यावे.

डॉ. रॉय पाटणकर

Back to top button