एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये २४ टक्क्यांची वाढ | पुढारी

एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये २४ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सरत्या एप्रिल महिन्यात निर्यातीमध्ये २४.२२ टक्क्यांची भरीव वाढ झाली असल्याची माहिती उद्योग आणि व्यापार मंत्रालयाकडून  मंगळवारी देण्यात आली. गतवर्षीच्या एप्रिलमधील ३०.७५ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत सरत्या एप्रिलमध्ये ३८.१९ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली आहे. एप्रिलमध्ये पेट्रोलियम पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच रसायनांच्या निर्यातीत समाधानकारक वाढ नोंदविण्यात आली असल्याचेही व्यापार मंत्रालयाने नमूद केले आहे.

एप्रिलमध्ये आयात २६.५५ टक्क्याने वाढत ५८.२६ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. या महिन्यातील एकूण व्यापार तूट २०.०७ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात व्यापार तूट १५.२९ अब्ज डॉलर्स इतकी होती. सरत्या महिन्यात पेट्रोलियम पदार्थांची निर्यात  १२.३२ टक्क्याने वाढली. तर गैर पेट्रोलियम पदार्थांची निर्यात वाढून २७.१२ अब्ज डॉलर्स इतकी झाली. विशेष म्हणजे गत आर्थिक वर्षात पहिल्यांदाच देशाच्या निर्यातीचा आकडा चारशे अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button