राहुल गांधींची ‘ती’ मैत्रीण कोण? जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले, अन्.. | पुढारी

राहुल गांधींची ‘ती’ मैत्रीण कोण? जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले, अन्..

पुढारी ऑनलाईन डेस्क : राहुल गांधींचा एक व्हिडिओ (rahul gandhi video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका पबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर भाजपने सातत्याने काँग्रेस नेत्याला घेरण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे वक्तव्यही समोर आले असून, राहुल गांधी त्यांच्या नेपाळ येथील एका मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की ती नेपाळी मैत्रीण कोण? जिच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी काँग्रेस नेते काठमांडूला पोहोचले. चला तर जाणून घेऊया राहुल गांधींच्या त्या नेपाळी मैत्रिणीबद्दल.

काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi video) त्यांची एक नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास (sumnima udas) हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांचा नेपाळ येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. हा नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स म्हणून ओळखला जात आहे.

नेपाळी वृत्तपत्र ‘द काठमांडू पोस्ट’च्या माहितीनुसार, राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुमनिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले आहेत. सुमनिमाचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींना (rahul gandhi video) मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते. मंगळवारी लग्नसोहळा होणार असून ५ मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भीम उदास हे नेपाळचे म्यानमारमध्ये राजदूत राहिले आहेत. त्यांची मुलगी सुमनिमा ही सीएनएनची (CNN) माजी वार्ताहर आहे.

राहुल गांधी यांची मैत्रीण सुमनिमा उदास (sumnima udas) हिचा विवाह नीमा मार्टिन शेर्पासोबत होत आहे. सुमनिमाने अमेरिकेतील ली विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यास क्रम पूर्ण केला असून ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. तिने पत्रकार म्हणून दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचे प्रकरण कव्हर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये सुमनिमा उदास यांनी अमेरिकन जर्नालिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले होते. त्यानंतर रात्री लग्नसोहळ्यापूर्वीच्या एका पार्टीत ते मैत्रिण सुमनिमासह (sumnima udas) सहभागी झाले. या पार्टीतील सहभागी झाल्याचा राहुल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये राहुल एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक मद्य प्राशन करत आहेत. त्यानंतर देशाच्या राजकारणात खळबळ माजली. भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसकडून राहुल यांचा बचाव करण्यात येत असून भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले की, राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी हे नेपाळमधल्या नाईटक्लबमध्ये मजा मारत आहेत. खरे तर त्यांना भारतातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशात असावयास हवे होते. काँग्रेस ही संपलेली पार्टी आहे. मात्र राहुल गांधी यांची पार्टी चालूच राहील. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये काय करीत आहेत, हे कोणाच्याही आकलनापलिकडे आहे. भाजपचे दुसरे प्रवक्ते अमित मालवीय यांनी मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हादेखील राहुल गांधी नाईटक्लबमध्ये होते, असे सांगत जेव्हा काँग्रेस संकटात असते, तेव्हा ते नाईटक्लबमध्ये असतात, असा टोला मारला आहे.

सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका चालवली आहे. सुट्टी,पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, खासगी विदेश दौरा या गोष्टी आता देशाला नवीन राहिलेल्या नाहीत, असा टोमणा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मारला आहे. दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी कोणासोबत आहेत? ते चीनी एजंटसोबत आहेत काय? राहुल गांधी हे चीनच्या दबावाखाली सोशल मीडीयावर संदेश देत असतात? हा त्यांच्या खासगी जीवनाचा मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे…आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. पहचान कौन? असा उपरोधिक टोलाही मिश्रा यांनी मारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumnima Udas (@sumnimaudas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumnima Udas (@sumnimaudas)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumnima Udas (@sumnimaudas)

 

Back to top button