RBI Gold Bond : स्वस्तात सोनं खेरदी करण्याची ‘सुवर्णसंधी’! उद्यापासून अर्ज करता येणार | पुढारी

RBI Gold Bond : स्वस्तात सोनं खेरदी करण्याची 'सुवर्णसंधी'! उद्यापासून अर्ज करता येणार

पुढारी, ऑनलाईन डेस्क : सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तसेच स्वस्त सोने खरेदीसाठी केंद्र सरकार सोने खरेदीची सुवर्णसंधी घेऊन येत आहे. गोल्ड बाँड योजनेअंतर्गत बाँड २०२१-२२ साठी प्रति ग्रॅम ५१०९ रूपये निश्चित केली आहे. मध्ये गुंतवणूकीसाठी सोमवार (दि.१८) अर्ज करण्यात येणार आहे. गोल्ड बाँडचा दहावा हप्ता खरेदीसाठी २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२१ पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असणार असल्याचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका निवेदनातून सांगितले आहे.

काय म्हणाली मध्यवर्ती बँक

निवेदनात म्हटले आहे की, गोल्ड बाँडची मूळ किंमत ही प्रति ग्रॅम निश्चित ५१०९ रूपये असेल. केंद्र सरकारने आरबीआयशी (RBI) सल्लामसलत करून, ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खरेदी धारकाला डिजिटल माध्यमातून पैसे भरावे लागतील. ऑनलाइन डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँडची किंमत ५०५९ रुपये प्रति ग्रॅम असणार आहे, असेही आरबीआयने (RBI) सांगितले.

गोल्ड बाँड कोठे खरेदी करावे?

गोल्ड बाँडचा नववा हप्ता खरेदीसाठी १० ते १४ जानेवारी, २०२१ या कालावधीत खुला होता. या कालावधीतच सोन्याची इश्यू किंमत ४७८६ रुपये प्रति ग्रॅम होती. यानंतर गोल्ड बाँड खरेदीचा दहावा हप्ता २८ फेब्रुवारीपासून नव्याने सुरू होणार आहे. भारत सरकारच्यावतीने रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया हे बाँड सादर करतील. मध्यवर्ती बँकनुसार या बाँडची विक्री स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (SHIL), अधिकृत पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE या मान्यताप्राप्त शेयर बाजाराच्या माध्यमातून केली जाईल.

कोण अर्ज करू शकतो?

गोल्ड बाँड योजनेअंतर्गत, सामान्य गुंतवणूकदार किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोने किंमतीचे बाँड खरेदी करू शकतात. अविभक्त हिंदू कुटुंबे ४ किलोसाठी अर्ज करू शकतात. तसेच ट्रस्ट आणि एखादे युनिट प्रत्येक आर्थिक वर्षात २० किलो सोने किंमतीचे बाँड खरेदी साठी अर्ज करू शकते.

video : मराठी राजभाषा गौरव दिन विशेष : लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

हेही वाचलत का ?

Back to top button