भोंगा वाद : एमआयएमचे प्रमुखअसदुद्दीन ओवैसी म्‍हणाले, “राज ठाकरे यांना…” | पुढारी

भोंगा वाद : एमआयएमचे प्रमुखअसदुद्दीन ओवैसी म्‍हणाले, "राज ठाकरे यांना..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

राज्‍यात भोंग्‍यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्‍यावर सत्ताधारी आणि विरोधक राज्‍यात आमने-सामने आले आहेत. राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबादमध्‍ये जाहीर सभा घेत पुन्‍हा एकदा मशिदीवरील भोंगे उतरवण्‍याचे आवाहन केले आहे.यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्‍यावर टीकेची झोड उठवली आहे.

असदुद्दीन ओवैसी म्‍हणाले की, राज ठाकरे यांचे रविवारी औरंगाबाद येथे झालेले भाषण हिंसाचाराला खतपाणी घालणारे होते. याची पोलिसांनी गंभीर दखल घ्‍यावी. महाराष्‍ट्र मोठा आहे की एक व्‍यक्‍ती. महाराष्‍ट्रात नवनीत राणा यांच्‍यावर कारवाई होत असेल तर राज ठाकरे यांच्‍यावर का कारवाई होत नाही, असा सवालही त्‍यांनी केला.  राज ठाकरे यांना तुरुंगात टाका त्‍यांचे डोके थोडे शांत होईल, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

राज ठाकरे यांना तत्‍काळ अटक करा : प्रवीण गायकवाड

राज ठाकरे हे आपल्‍या भाषणांमधून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्‍यांना तत्‍काळ अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्‍यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

यावेळी प्रवीण गायकवाड म्‍हणाले की, “राज्‍यात चुकीचा इतिहास लिहिला जातोय. राज ठाकरे जातीयवाद निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. त्‍यांना तत्‍काळ अटक करा. राज ठाकरे यांचे राजकारण घातक असून, राज्‍यघटनेविरोधात आहे. ते चुकीचा इतिहास सांगत राजकारण करत आहे. त्‍यांना अटक झालीच पाहिजे”.

हेही वाचा : ं

 

 

 

 

 

 

 

Back to top button