‘बुलडोझर’, राजकीय ‘भोंगे’ सुरु असतानाच देशात बेरोजगारीचा दर तब्बल ९.२२ टक्क्यांवर ! | पुढारी

'बुलडोझर', राजकीय 'भोंगे' सुरु असतानाच देशात बेरोजगारीचा दर तब्बल ९.२२ टक्क्यांवर !

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील बेरोजगारी दर चांगलाच वाढत चालला आहे. मार्च महिन्यात नोंदवण्यात आलेल्या ७.६० टक्क्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात हा दर ७.८३% नोंदवण्यात आला. गेल्या महिन्याभरात शहरी बेरोजगारीचा दर वाढून ९.२२ टक्क्यांवर पोहचला.

मार्च महिन्यात हा दर ८.२८% होता. दिलासादायक बाब म्हणजे ग्रामीण बेरोजगारी दर ७.२९ टक्क्यांनी कमी होवून ७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सर्वाधिक ३४.५% बेरोजगारी दर हरियाणात नोंदवण्यात आला. या राज्यापाठोपाठ राजस्थानमध्ये हा दर २८.८% नोंदवण्यात आला.

वाढत्या किंमतींमुळे आर्थिक सुधारणांचा वेग मंदावल्याने रोजगार निर्मितीवर खीळ बसल्याचे मत अर्थशास्त्रज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. प्राप्त माहितीनूसार किरकोळ महागाई मार्च महिन्यात वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकी ६.९५ टक्क्यांवर पोहचली आहे. वर्षअखेपर्यंत किरकोळ महागाई ७.५ टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button