पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा सुरु, जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये भव्य स्वागत | पुढारी

पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा सुरु, जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये भव्य स्वागत

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांचा युरोप दौरा करत आहोत. यासाठी ते जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आज सोमवारी (दि.२) रोजी सकाळी पोहोचले. तेथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. बर्लिनमध्ये ते भारत आणि जर्मनीच्या आयजीसी (IGC) बैठकीत सहभागी होणार आहेत. ते जर्मनीच्या चान्सलर ओलाफ स्कॉल्ज यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बर्लिन येथील हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे पोहेचताच तेथील भारतीयांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी मोदींनी लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यादरम्यान, पंतप्रधान मोदींचे एका मुलीने आपल्या आवाजात गाणे गावून स्वागत केले. या मुलीचे पंतप्रधानांनी खूपच कौतुक केले. संध्याकाळच्या सुमारास मोदी जर्मनीत परदेशी भारतीयांना संबोधित करणार आहेत. यानंतर ते बर्लिनहून डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनला पुढील दौऱ्यासाठी उद्या मंगळवारी (दि. ३ मे रोजी) पोहोचणार आहेत.

मोदींचा हा दौरा महत्वाचा असून भारताच्या शांतता आणि समृद्धीत महत्त्वाचा भाग राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांची भेट होणार असल्याचे सांगितले आहे. भारताचा आंतर सरकारी सल्लामसलत (IGC) फक्त जर्मनीसोबत आहे, जो दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. ६ व्या आईजीसी (IGC) नंतर एक उच्च-स्तरीय गोलमेज परिषद होईल जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चान्सलर स्कोल्झ दोन्ही देशांतील शीर्ष सीईओंशी चर्चा करणार आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button