देशाचे नवीन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला पदभार! | पुढारी

देशाचे नवीन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला पदभार!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे नवीन लष्करप्रमुख, महाराष्ट्राचे सुपूत्र जनरल मनोज पांडे यांनी शनिवारी (दि.30) पदभार स्‍विकारला. त्‍यांनी देशाचे मावळते लष्करप्रमुख एमएम नरवणे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. तर ते देशाचे २९ वे लष्करप्रमुख बनले असून जेष्ठतेनुसार हे पद त्यांना मिळाले.

विशेष म्हणजे ते क्रोर्प्स ऑफ इंजिनिअर्समधून लष्करप्रमुख बनणारे पहिलेच अधिकारी आहेत. याचवर्षी १ फेब्रुवारी रोजी लेफ्टनंट जनरल पांडे हे लष्कराचे उप-प्रमुख बनले होते. यापूर्वी ते पुर्व लष्कर कमान प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अंदमान आणि निकोबारचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहेत.

जनरल मनोज पांडे नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी राहीले आहेत. डिसेंबर १९८२ मध्ये बॉम्बे सॅपर्स, क्रोर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.जम्मू-काश्मीर येथे ऑपरेशन पराक्रमच्या वेळी नियंत्रण रेषे जवळ एका इंजीनियर रेजिमेंटचे नेतृत्व देखील त्यांनी केले आहे. लडाखमधील पर्वतीय भागातील कामाचा अनुभवही त्यांना आहे. दरम्यान देशाचे मावळते लष्कर प्रमुख मनोज मुंकूद नरवणे यांनी त्यांच्या पत्नी वीणा नरवणेंसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यांची भेट घेतली.

हेही वाचा  

Back to top button