सपा कधीच सत्तेत येणार नाही, अखिलेश यादव विदेशात पळून जातील : मायावती | पुढारी

सपा कधीच सत्तेत येणार नाही, अखिलेश यादव विदेशात पळून जातील : मायावती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील मुस्‍लिम बांधव समाजवादी पार्टीवर नाराज आहेत. हा पक्ष कधीच सत्तेत येणार नाही. अखिलेश यादव विदेशातून पळून जातील, अशा शब्‍दात बहुजन समाज पार्टीच्‍या ( बसपा) प्रमुख मायावती यांनी आज समाजवादी पार्टीवर (सपा )हल्‍लाबोल केला.

राष्‍ट्रपती होण्‍याचे स्‍वप्‍न नाही, ‘सपा’मुळेच भाजप पुन्‍हा सत्तेत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एक निवेदन प्रसिद्‍ध करत मायावती यांनी भविष्‍यातील आपली वाटचाल स्‍पष्‍ट केली. या निवेदनात म्‍हटलं आहे की, मी पंतप्रधान आणि मुख्‍यमंत्री होण्‍याचे स्‍वप्‍न पाहू शकते; पण देशाचे राष्‍ट्रपती व्‍हावे, हे माझे स्‍वप्‍न नाही. माझ्‍याबद्‍दल समाजवादी पार्टी अफवा पसरवत आहे. ‘सपा’मुळे उत्तर प्रदेशमध्‍ये पुन्‍हा भाजप सत्तेत आला आहे. आज मुस्‍लिम बांधव हे सपावर नाराज आहेत. मुस्‍लिम आणि दलितांच्‍या मतांमध्‍ये खूप ताकद आहे. हे दोन्‍ही घटक बसपाशी जोडले गेले तर उत्तर प्रदेशमध्‍ये पुन्‍हा मुख्‍यमंत्री होईन, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

समाजवादी पार्टी सरकार आणि त्‍यानंतर भाजप सरकारच्‍या काळात उत्तर प्रदेशमधील स्‍मारक आणि बागांची दुरावस्‍था झाली आहे. नुकतेच आम्‍ही यासंदर्भात मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांना एक निवेदन दिले आहे. या प्रश्‍नी राज्‍य सरकारने तत्‍काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button