मोदी सरकारची आठ वर्ष; भाजपकडून जंगी कार्यक्रमांचे आयोजन | पुढारी

मोदी सरकारची आठ वर्ष; भाजपकडून जंगी कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (modi gornment) यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ८ वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या २६ मे रोजी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय महासचिवांची बैठक बोलावली आहे. बैठकीतून कार्यक्रमांच्या रूपरेषेसंबंधी चर्चा करण्यात येणार असल्याचे माहिती सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

पुढील महिन्यात मोदी सरकारच्या (modi gornment) दुसऱ्या कार्यकाळाचे तीन वर्ष देखील पुर्ण होत आहे. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेत ‘एनडीए’ने देशाचा कारभार हाती घेतला होता. सत्तेवर येताच भाजपने अनेक लोककल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली. मोदी सरकारने देशात उज्वला, जनधन, हर घर नल सारख्या अनेक योजना सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याचा दावा भाजपने केला आहे.

या योजनांमुळे ग्राउंड लेवलवर बदल झाल्याचे देखील भाजपकडून सांगितले जात आहे. सरकारच्या (modi gornment) वतीने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देखील साजरा केला आहे. अशात कोरोना काळानंतर यंदाचा मोदी सरकारच्या ८ वर्ष पुरतीचा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान,काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर ८ वर्ष पुर्तीनिमित्त टिकास्त्र सोडले आहे. ८ वर्षाच्या मोठ्या चर्चेच्या परिणामस्वरुप देशाकडे केवळ ८ दिवस पुरेल एवढाचा कोळसा साठा शिल्लक असल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. दिल्ली तसेच मध्य प्रदेशातील हिंसा प्रभावित परिसरांमध्ये बुलडोजरचा वापरावर टीका करीत ‘द्वेषाचे बुलडोजर’ बंद करून वीज संत्रणांना चालू करण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी सरकारकडे केला आहे.

Back to top button