

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मंगळवारी (दि.२६) ते दिल्लीकडे रवाना होतील. त्यांचा हा शासकीय दौरा असून दिल्लीत ते काही राजकीय नेत्यांची गाठीभेट घेणार आहेत. तसेच काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, राज्यात भाजप -शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने राज्य ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचे दिलेले आव्हान, त्यावरून आक्रमक झालेले शिवसैनिक, आणि या सर्व घडामोडींनंतर राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिक हल्ला केला. यारून राज्याचे राजकारण तापले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडमोडी, आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेल्या राजकारणाचा मुद्दा दिल्ली दरबारी पोहचला आहे. आज (सोमवार) सकाळी १० वाजता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासह इतरांवर गेल्या काळात झालेल्या हल्ल्यांची माहिती देत राज्यातील कायदा-सुवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर सोमय्यांसह राज्यातील इतर व्यक्तींवर झालेले हल्ले चिंताजनक असून परिस्थितीचा अभ्यास करू, गरज भासल्यास राज्यात पथक पाठवू, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय सचिवांकडून देण्यात आले. या शिष्टमंडळात आमदार मीहिर कोटेचा, अमित साटम, पराग शाह, राहुल नार्वेकर,विनोद मिश्रा यांचा समावेश होता.
हेही वाचलंत का ?