पाकिस्तानमधील उच्च शिक्षण भारतात ग्राह्य नाही : यूजीसी, एआयसीटीईचा विद्यार्थी-पालकांना सूचक इशारा | पुढारी

पाकिस्तानमधील उच्च शिक्षण भारतात ग्राह्य नाही : यूजीसी, एआयसीटीईचा विद्यार्थी-पालकांना सूचक इशारा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानमध्ये घेतलेले शिक्षणाला भारतात ग्राह्य धरले जाणार नाही, असा सूचक इशारा विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि इंडिया कॉउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडून (एआयसीटीई) देण्यात आला आहे.

पाकिस्तानमधील अनेक शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या अनुषंगाने योग्य नाहीत

उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पूर्व सल्ला देताना युजीसीने स्‍पष्‍ट केले आहे की, “पाकिस्तानमधील अनेक शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या अनुषंगाने योग्य नाहीत, असे एआयसीटीईच्या अध्यक्षांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संयुक्तरित्या दोन्ही संस्थांनी दिलेल्या सल्ल्यानूसार पाकिस्तानच्या कुठल्याही पदवी महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये मिळवलेल्या योग्यतेच्या आधारे भारतात रोजागार अथवा उच्च शिक्षणाकरिता पात्र धरले जाणार नाही”.

गृहमंत्रालयाकडून सुरक्षा मंजूरीनंतर भारतात रोजगार प्राप्तीसाठी पात्र ठरतील

अप्रवासी भारतीय त्यांचे मुले ज्यांनी पाकिस्तानमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. ज्यांना भारतीय नागारिकत्व मिळाले आहे, असे नागरिक गृहमंत्रालयाकडून सुरक्षा मंजूरीनंतर भारतात रोजगार प्राप्तीसाठी पात्र ठरतील, असे देखील यूजीसी आणि एआयसीटीईने स्पष्ट केले. विदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चीन तसेच युक्रेनमध्ये आलेल्या अनुभवामुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागले. हा अनुभव लक्षात घेता विद्यार्थी तसेच पालकांना यासंबंधी इशारा देणे आवश्यक आहे, असे एआयसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांनी दिली. विद्यार्थ्यांना सावध करणे हाच यामागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

 

Back to top button