रत्नागिरी : जिल्ह्यात २ दिवसात ४०० हून अधिक चाचण्या; एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही | पुढारी

रत्नागिरी : जिल्ह्यात २ दिवसात ४०० हून अधिक चाचण्या; एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दिवसात ४००  हून अधिक कोरोना चाचण्या जिल्हयात करण्यात आल्या होत्या. मात्र, एकही यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली असून लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करा अशा सूचना आरोग्य मंत्रालयाकडून आल्याने जिल्हा रुग्णालयाने आता चाचण्या वाढविण्यास सुरुवात केली असली तरी लसीकरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक वातावरण आहे, तरी देखील केवळ एक खबरदारी म्हणून २ दिवसात वाढीव चाचण्या घेण्यात आल्या मात्र एकही रुग्ण आढळला नाही. यावरून आता लक्षात येते की, लसीकरणमुळे ही संख्या पूर्णतः घटली असून चौथी लाट आली तरी याचे सौम्य परिणाम दिसतील, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

लोकांमध्ये आता कोरोनाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक स्वतःहून काळजी घेत आहेत, अशीच काळजी घेतल्यास चौथ्या लाटेला सहज सामोरे जाऊ शकतो, असेही वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे.

Back to top button