कोरोनाचा धोका कायम : उत्तर प्रदेशमधील सात जिल्‍ह्यांमध्‍ये पुन्‍हा मास्‍क सक्‍ती | पुढारी

कोरोनाचा धोका कायम : उत्तर प्रदेशमधील सात जिल्‍ह्यांमध्‍ये पुन्‍हा मास्‍क सक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेश प्रदेश सीमेवरील काही जिल्‍ह्यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. काेराेनाचा धाेका कायम असल्‍याने याची गंभीर दखल मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी घेतली आहे. आता लखनौसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्‍थान राज्‍यांतील काही भागांचा समावेश असणार्‍या ‘एनसीआर’ मधील काही जिल्‍ह्यांमध्‍ये मास्‍क वापर सक्‍तीचा करण्‍यात आला आहे. राज्‍यातील एकुण सात जिल्‍ह्यात काेराेना रुग्‍णसंख्‍या वाढत असल्‍याने येथे सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ म्‍हणाले की, ‘एनसीआर’मधील गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापुड, मेरठ बुलंदशहर, बागपत शहरासह लखनौ या जिल्‍ह्यांमध्‍ये मास्‍कचा वापर सक्‍तीचा केला आहे. या शहरांमधील लसीकरण न झालेल्‍यांचा शोध घेवून त्‍यांचे लसीकरण केले जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्‍यांची चाचणी केली जाईल. तसेच या शहरांमधील कोरोनाचा आढावा घेण्‍यात येईल.”

मागील २४ तासांमध्‍ये गौतमबुद्ध नगर,गाझियाबाद आणि लखनौ शहरामध्‍ये अनुक्रमे ६५, २० आणि १० नवे रुग्‍ण आढळले. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्‍ज झाली आहे. कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढली तरी रुग्‍ण गंभीर होण्‍याचे प्रमाण कमी आहे. या शहरांमधील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्‍यासाठी व्‍यापक मोहिम राबविण्‍यात येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्‍ये सध्‍या कोरोनाचे ६९५ रुग्‍ण आहेत. मागील २४ तासांमध्‍ये ८३हजार ८६४ चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. यामध्‍ये ११५ जणांना कोरोना लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

राज्‍यात कोरोना प्रतिबंधक पहिला डोस राज्‍यात १०३ टक्‍के झाला आहे. तर दुसरा डोस हा ८६.३४ टक्‍के लोकसंख्‍येने दोन्‍ही डोस घेतलेले आहेत. १५ ते १७ वयोगटातील मुलांचे ९४ टक्‍के लसीकरण झाले आहे. तसेव १२ ते १४ वयोगटातील मुलांना पहिल्‍या डोसनंतर दुसरा डोस देण्‍यात येणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button