Table Tennis Player : तामिळनाडूमधील युवा टेबल टेनिसपटूचे अपघाती निधन, स्‍पर्धेला जाताना मेघालयमध्‍ये काळाचा घाला | पुढारी

Table Tennis Player : तामिळनाडूमधील युवा टेबल टेनिसपटूचे अपघाती निधन, स्‍पर्धेला जाताना मेघालयमध्‍ये काळाचा घाला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूमधील युवा टेनिसपटू (Table Tennis Player) विश्‍वा दीनदयालन (वय १८) याचे
मेघालयमध्‍ये अपघाती निधन झाले. गुवाहाटी ते शिलाँग असा टॅक्‍स्‍ने प्रवास करत असताना रविवारी ही दुर्घटना घडली.

Table Tennis Player : ट्रकने दिली टॅक्‍सीला धडक

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने (टीटीएफआय) यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की, शिलाँग येथे ८३ व्‍या आंतरराज्‍य टेबल टेनिस स्‍पर्धा सोमवार (दि. १८) पासून सुरु होणार आहे. या स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी आपल्‍या तीन सहकार्‍यांसमवेत विश्‍वा हा गुवाहाटीवरुन शिलाँगला टॅक्‍सीने जात होता. मेघालयातील शांगबांग्‍ला येथे ट्रकने टॅक्‍सीला धडक दिली. टॅक्‍सी चालक जागीच ठार झाला. तर विश्‍वा व त्‍याचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले. त्‍यांना नोंगपोहमधील सरकारी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले.

युवा टेबल टेनिसपटू विश्‍वा याने अनेक राष्‍ट्रीय आणि आतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये पदके पटकावली होती. ऑस्‍ट्रियामध्‍ये झालेल्‍या स्‍पर्धेत त्‍याने देशाचे प्रतिनिधत्‍व केले होते. विश्व दीनदयालन हा एक अत्‍यंत प्रतिभावंत युवा टेबल टेनिस खेळाडू होता, असे एमटीटीएचे उपाध्‍यक्ष ब्रूस पी मारक आणि महासचिक चिरंजीब चौधरी यांनी म्‍हटले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button