Jammu & Kashmir : जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथील चकमकीत एक दहशतवादी ठार; सुरक्षादलाकडून ऑपरेशन सुरू | पुढारी

Jammu & Kashmir : जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथील चकमकीत एक दहशतवादी ठार; सुरक्षादलाकडून ऑपरेशन सुरू

पुढारी ऑनलाईन : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे बुधवारी (दि.६) झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. मारला गेलेला दहशतवादी हा लष्कर-ए-तैयबा या दशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती जम्मू-कश्मीर पोलिसांकडून मिळाली आहे. भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारपासून ही चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय सुरक्षा दलाने चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-56 रायफल, 3 एके मॅगझिन आणि 80 एके राऊंड याशिवाय गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त केले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला अवंतीपोरा येथील चारसू गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी या परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध पथक संशयास्पद ठिकाणाकडे जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी ओवेस राजा हा दहशतवादी ठार झाला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने आणि स्थानिक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  ओवेस हा गेल्या तीन महिन्यांपासून घरातून बेपत्ता होता. त्याचा बराच वेळ शोध सुरू होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचे कुटुंबीय आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. तो घरातून संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला होता. काश्मीर रेंजचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी म्हटले आहे का, हे ऑपरेशन अतिशय महत्त्वाचे असल्याचे वर्णन केले आहे. कारण  सुरक्षा दलाकडून ही कारवाई राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी जवळ केले गेले.  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास होईपर्यंत चकमकीच्या ठिकाणाजवळ न जाण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button