Sanjay Raut : आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेला पैसा 'महात्मा' किरीट सोमय्यांनी खाल्ला | पुढारी

Sanjay Raut : आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेला पैसा 'महात्मा' किरीट सोमय्यांनी खाल्ला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्यात आला होता. तो पैसे राजभवनात जमा करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. आरटीआयमधून ही माहिती बाहेर आली आहे. जवळजवळ ५७ कोटी रुपये ही रक्कम असल्याची माहिती समजते आहे. याबाबत राज्यपालांच्या कार्यालयात आरटीआय अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती त्यामध्ये राज्यपाल कार्यालयाकडून असा कोणताही निधी जमा झाला नसल्याचे सांगण्यात आले. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut )

हा निधी भाजपच्या कार्यालयात गेला. या पैशाचा गैरवापर वापर किरीट सोमय्यांनी केला आहे. या घोटाळ्यात किरीट सोमय्या हेच मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी आपल्या कंपनीसाठी हा पैसा वापरल्याचे समोर येईल. ज्यावेळी हा पैसा गोळा करण्यात आला त्यावेळी आम्ही ५ हजार रुपये टाकून निधी दिला आहे. पण हा सगळा पैसा किरीट सोमय्यांच्या कंपनीला गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

विक्रांत वाचवण्यासाठी नेव्हीतील काही अधिकाऱ्यांनीही रक्कम दिली. त्यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे. किरीट सोमय्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. त्यांना हा देश माफ करणार नाही. सध्याचे राज्यपाल हे भाजपशासित आहेत.

आयएनएस विक्रांत भंगारात गेली. तिला वाचवण्यासाठी गोळा केलेले पैसे त्यांनी निवडणुकीत वापरले. हा माणूस सीए असल्याने त्याला असला पैसा कुठे मुरवायचा याची चांगलीच माहिती असल्याचे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

ईडी आयकर विभाग आणि सीबीआयने तपास करावा एवढी मोठी ही घटना आहे. केंद्राने याबाबत गंभीर दखल घ्यावी. काल माझ्याकडे नेव्ही अधिकारी भेटण्यासाठी आले होते त्यांनीही याबाबत खंत व्यक्त केली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Back to top button