देशात २२ एम्स रुग्णालयांची निर्मिती सुरु; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती | पुढारी

देशात २२ एम्स रुग्णालयांची निर्मिती सुरु; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, 22 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) स्थापन करण्यात येत आहेत. त्यापैकी 6 पूर्णपणे कार्यरत आहेत आणि 10 OPD सुरू आहेत. मनसुख मांडविया यांनी मंगळवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली.

यावेळी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते म्‍हणाले, सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने देशात आयुष्मान भारत आणि राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान यासारख्या योजना सुरू करण्यात आल्‍या आहेत. तसेच लोकांना जवळच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, देशातील एम्स रुग्णालयांची संख्या 22 करण्यात आली आहे. यापैकी सहा एम्स पूर्णपणे कार्यान्वित आहेत. आणि 10 ओपीडी सेवा सुरू झाल्या आहेत. इतर एम्स रुग्णालयांचे काम विविध टप्प्यात सुरू आहे. प्रत्येक एम्समध्ये दररोज सरासरी 15,000 रुग्ण तपासले जातात. तर दर महिन्याला सात हजार ऑपरेशन केले जात आहेत. यामुळे प्रत्येक एम्सला वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडण्यात येणार आहेत.

तसेच, सरकार कुशल वैद्यकीय कर्मचार्‍यांची कमतरता पूर्ण करत असून, वैद्यकीय सुविधा दूरवरच्या भागात विस्तारित केल्या जात आहेत. याशिवाय सरकारकडून 75 हॉस्पिटल्स अपग्रेड करण्यात येत आहेत. तसेच पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना डॉ.पवार म्हणाले की, काम न करणाऱ्या डॉक्टर व इतर कामगारांवर कारवाई करण्यात येईल. आणि त्यासाठी एक प्रक्रियाही असेल. असे ते म्‍हणाले.

हेही वाचा   

Back to top button