प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलचे आमदार भिडले, भाजपचे ५ सदस्‍य निलंबित | पुढारी

प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलचे आमदार भिडले, भाजपचे ५ सदस्‍य निलंबित

कोलकाता ; पुढारी ऑनलाईन

पश्‍चिम बंगाल राज्‍यात सुरु असलेल्‍या रक्‍तरंजित राजकारणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. भाजप-तृणमूलचे आमदारांमध्‍ये जोरदार राडा झाला. यामध्‍ये एक आमदार जखमी आहे. याप्रकरणी विधानसभा अध्‍यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांच्‍यासह पाच आमदारांना निलंबित केले आहे. आमदारांमध्‍ये हाणामारी झाल्‍याने राज्‍यातील भाजप-तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र हाेण्‍याचे संकेत मिळत आहेत.

सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरु झाले. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे आमदार आमने-सामने आले.  तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार आणि भाजपचे मनोज तिग्‍गा यांनी एकमेकांवर हल्‍ला केला. यामध्‍ये मुजमदार जखमी झाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा अध्‍यक्षांनी भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्‍यासह पाच आमदारांना निलंबित केले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button