birbhum violence : बीरभूम प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रीया | पुढारी

birbhum violence : बीरभूम प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रीया

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील बिरभूम (birbhum violence) जिल्ह्यात एका हिसंक घटनेत मंगळवारी (दि.२२) काही घरे पेटवून देण्यात आली. यात आठ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने देशात संतापाची लाट उठली आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर हिसंक जमावाने तेथील घरे पेटवून दिली. आता या घटनेवर पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. पंतप्रधानांनी ट्विटवर म्हटले आहे, ‘ हे अघोरी कृत्य करणाऱ्यांना पश्चिम बंगालची जनता कधीच माफ करणार नाही’.

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातीत (birbhum violence) बोगतू गावात सोमवारी तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भडू शेख यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर रामपूरहट येथे संतापलेल्या हिंसक जमावाने आठ घरे पेटवून दिली. या घटनेत आठ व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. या हिंसेमुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तसेच या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले असून या प्रकरणी तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे.

या प्रकरणाची दखल स्वत: पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. ते ट्वीट मध्ये असे म्हणातात, ‘हे अघोरी कृत्य करणाऱ्यांना पश्चिम बंगाची जनता कधीही माफ करणार नाही.’ या शिवाय त्यांनी या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले. तसेच मला आशा आहे की बंगालच्या महान भूमीवर असे घृणास्पद पाप करणाऱ्यांना राज्य सरकार नक्कीच शिक्षा देईल आणि मी बंगालच्या जनतेलाही विनंती करतो की, अशा घटना घडवणाऱ्यांना, अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कधीही माफ करू नका. असे ही ट्वीट द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

या घटनेनंतर बीरभूम जिल्ह्यात (birbhum violence) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने घेतली आहे. याबाबत न्यायालयाने एक जनहित याचिका दाखल करुन घेत याबाबत बुधवारी सुनावणी घेतली. यावेळी सुनावणीत न्यायालयाने सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. बुधवारी दुपारी २ वाजता झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारकडून गुरुवार पर्यंतचा स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. शिवाय साक्षीदारांच्या संरक्षणासह घटनास्थळाची २४ तास पाळत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जमावाकडून घडलेल्या या घटनेत तब्बल ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला व बालकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र प्रतिसाद राज्यात उमटत आहेत. भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा तपास सीबीआय मार्फत करावा अशी मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी सीआयटीद्वारे तपासाचे आदेश दिले आहे. आता पर्यंत या प्रकरणात २० लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नसल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

Back to top button