‘दम असेल तर दिल्ली एमसीडी निवडणूक जिंकून दाखवा’ ! केजरीवालांचे भाजपला आव्हान | पुढारी

'दम असेल तर दिल्ली एमसीडी निवडणूक जिंकून दाखवा' ! केजरीवालांचे भाजपला आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खूले आव्हान दिले आहे. ‘हिंम्मत असेल तर एमसीडी निवडणूक वेळेत घेऊन जिंकून दाखवा’ जर ही निवडणूक तुम्ही जिंकून दाखवली तर मी राजकारण सोडेल. भाजपचे नेते आमचा पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगतात आणि दिल्लीतील एका छोट्या पक्षाला घाबरले. हिंम्मत असेल तर ही निवडणूक लढवून दाखवा, असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

दिल्ली नगर निगमच्या निवडणूका टाळणे हा शहिदांचा अपमान आहे. ज्यांनी इंग्रजांपासून भारताला स्वातंत्र मिळवून दिले, देशासाठी मोठे योगदान दिले होते या सर्वांचा अपमान आहे. आज भाजप पराभवाच्या भीतीने दिल्ली नगर निगमच्या निवडणूका टाळत आहे, उद्या हे देशाच्या आणि राज्यांतील निवडणूकाही टाळतील. असे म्हणत त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत. एमसीडीच्या निवडणूका तिन्ही निगमांना एक करण्यासाठी निवडणूका टाळल्या जाऊ शकतात? उद्या भाजप गुजरातमध्ये निवडणूक हारत असेल तर तिथेही निवडणूका टाळेल का?

दिल्लीचे मुख्यमंत्री आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज शहीद दिवस आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तिघांनाही आज फाशी दिली गेली होती. तिघेही देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी शहीद झाले. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील जनतेला संविधानाने संपूर्ण ताकद दिली. जनता सरकार निवडू शकते. गेल्या काही दिवसांपासून पहायला मिळत आहे की, भाजप निवडणूका टाळून एका प्रकारे शहीदांचा अपमान करत आहे.

निवडणूकीत भाजपचा यावेळेस सुफडा साफ होणार होता या पराभवापासून वाचण्यासाठी दबाव टाकून निवडणूका टाळल्या जात आहेत. भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकला आहे. जर देशात निवडणूका झाल्या नाहीत, तर लोकशाही कशी वाचणार, जनतेचा आवाज कसा राहणार ? सर्वांत जास्त दुःख आज भगतसिंगांना होत असेल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या आदेशानुसार दिल्लीच्या तिन्ही नगर निगमांच्या निवडणूका अनिश्चित काळापर्यंत टाळल्या आहेत. या मुद्यावरून दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने भाजपला घेरले आहे. भाजप आमच्या पक्षाला भीत आहे म्हणून निवडणूक टाळत असल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला. केंद्र सरकार दक्षिण दिल्ली नगर निगम, उत्तर नगर निगम आणि पुर्व दिल्ली नगर निगमचे विलीनीकरण करून दिल्ली नगर निगम स्थापन करू पाहत आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button