UAE Vs NEPAl : बॅटसमन बोल्ड होताच बॉलरच्या त्या कृत्याने सारेच झाले ‘शॉक’ (Video) | पुढारी

UAE Vs NEPAl : बॅटसमन बोल्ड होताच बॉलरच्या त्या कृत्याने सारेच झाले ‘शॉक’ (Video)

दुबई; पुढारी ऑनलाईन : ICC क्रिकेट विश्वचषक लीग टू 2019-23 (ICC Cricket World Cup League Two 2019-23) दरम्यान, 21 मार्च रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या नेपाळ आणि युएई (UAE) (UAE Vs NEPAl) यांच्यातील सामन्यात असे काही घडले, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. नेपाळविरुद्धच्या सामन्यात यूएईने 99 धावांनी सामना जिंकला. याच सामन्यात यूएईचा फलंदाज रोहन मुस्तफा (Rohan Mustafa) 60 धावा केल्यानंतर नेपाळचा गोलंदाज सोमपाल कामी (Sompal Kami) याच्या हाती बोल्ड झाला. यानंतर मैदानावर असा नजारा पाहायला मिळाला की तो पाहून सगळेच शॉक झाले.

त्याचे असे झाले की, 46 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कामीने त्याच्या उत्कृष्ट चेंडूवर रोहन मुस्तफाला (UAE Vs NEPAl) बोल्ड केले. गोलंदाजी झाल्यावर फलंदाज मुस्तफा मागे वळला आणि पॅव्हेलियनमध्ये जाऊ लागला, तर गोलंदाज कामी विकेटचा आनंद साजरा करू लागला आणि वेगाने धावत फलंदाजाजवळ पोहोचला आणि फलंदाजाच्या पाठीवर जोरदार ठोसा मारला. हे दृश्य पाहून सगळेच शॉक झाले. पण त्यानंतर गोलंदाज आणि फलंदाज हसायला लागले.

हा प्रसंग पाहून शेवटी गोलंदाजाने फलंदाजाला का मारले हे कोणालाच समजले नाही, तरीही फलंदाजाने त्याला हरकत घेतली नाही आणि हसत हसत पॅव्हेलियनकडे चालत राहिला. पण नेमके हे काय प्रकरण आहे? याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम होता. पण आता यूएईचा फलंदाज मुस्तफाने ट्विट करून त्या घटनेवर आपले मत मांडले आहे. (UAE Vs NEPAl)

त्याने लिहिले, ‘तो माझा भाऊ आहे, माझ्यावर विश्वास ठेवा मी त्याच्या यशावर खूश आहे. वास्तविक, मुस्तफा आणि नेपाळी गोलंदाज कामी हे दोघेही चांगले मित्र आहेत हे उघड गुपित आहे. अशा स्थितीत सामन्यादरम्यान कामीने मित्राप्रमाणे आपली मैत्री व्यक्त केली होती.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर युएईने 50 षटकात 9 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या, त्यानंतर नेपाळचा संघ 35.1 षटकात केवळ 103 धावा करत सर्वबाद झाला. यूएईच्या जुनैद सिद्दीकीने 4 बळी घेतले.

Back to top button