Aditi pohankar : ‘लय भारी’ फेम अदिती पोहनकर इतकी बदलली | पुढारी

Aditi pohankar : 'लय भारी' फेम अदिती पोहनकर इतकी बदलली

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अदिती पोहनकर यांच्या ‘लय भारी’ चित्रपट खूपच गाजला. या चित्रपटात प्रेमाच्या जाळ्यात अडकून धोका देणाऱ्या ‘नंदीनी’ची भूमिका अदिती पोहनकरने ( Aditi pohankar ) साकारली आहे. अदिती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. सध्या तिचे इंन्स्टाग्रामवर ब्रालेट टॉप आणि डेनिम जीन्समधील फोटो व्हायरल होत आहे. परंतु, ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये साधी दिसणारी आदिती खऱ्या आयुष्यात मात्र, खूपच ग्लॅमरस दिसते आहे. यामुळे जाणून घेऊयात तिच्याविषयी….

लय भारीनंतर आदिती बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलसोबतच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये दिसली. या चित्रपटात तिने ‘पम्मी पहलवान’ची भूमिका साकारून चाहत्याचे लक्ष वेधून घेतले. आश्रम वेबसिरीजमध्ये साध्या सलावर कमीजमध्ये दिसलेली अदिती खऱ्या आयुष्यात मात्र, ती हॉट आणि ग्लॅमरस आहे. तिच्या इंन्स्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो पाहायला मिळतात. या फोटोत आदितीच्या फिटनेसचे चाहत्यांनीन भरभरून कौतुक केले आहे. तर काही चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

अदितीने ( Aditi pohankar ) नुकतेच इन्स्टाग्रामवर ब्रालेट टॉप आणि डेनिम जीन्समध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोत तिने जॅकेटची बटणे खुली ठेवत हटके पोझ दिली आहे. मेकअपसोबत मोकळे केसांनी तिच्या सौंदर्याला चार चॉद लावले आहेत. यातील एका फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Stay until the sun sets, please ?’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मला माझ्या बाबांसोबतचा रविवाराचा दिवस आठवतो! या दिवशी आम्ही मुंबई फिरत असो. घोड्यावर स्वार होत असो!. रविवारची मी नेहमी आतुरतेने वाट पाहत असे, या आळशी दुपारी मजा करू. कुठे अंदाज करा! माझ्या गच्चीवर! असे तिने म्हटले आहे. आदितीने हे फोटोशूट सनसेटच्या वेळी केले आहे.

यावरून आदितीला फिरण्यासोबत मौजमस्ती करण्याची आवड असल्याचे दिसते. याशिवाय तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही काय करता?’ असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. हा फोटो मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून प्रितिक्रिया दिल्या आहे. यात एका युजर्सने ‘क्यूट’, ‘ग्लॅमरस’, ‘हॉट’, ‘पतली कमर’ अशा कॅमेन्टस केल्या आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

कोण आहे अदिती पोहनकर

अदिती पोहनकरचा जन्म ३१ डिसेंबर १९९४ रोजी झाला. आदितीने हिंदी मराठी आणि तमिळ चित्रपटात काम केले आहे. ‘लव्ह सेक्स और धोका’ चित्रपटातून तिने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. रितेश देशमुखसोबतच्या ‘लय भारी’ चित्रपटात तिने खलनायकाची भूमिका साकारली होती. याशिवाय आदितीची ‘शी’ वेबसीरिज खूपच गाजली. यात तिने पोलिसाची भूमिका साकारली होती.

आदिती उत्तम डान्सर देखील आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला २०२० सालचा तिला किताब मिळाला आहे. अभिनयासोबत तिने गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर मॉडेल म्हणून काम केले आहे. यासिवाय. तिने अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

Back to top button