ICC Rankings : रवींद्र जडेजा पुन्हा नंबर वन ऑलराऊडर; रोहित शर्माला बसला फटका

ICC Rankings : रवींद्र जडेजा पुन्हा नंबर वन ऑलराऊडर; रोहित शर्माला बसला फटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या जागतिक क्रिकेटमध्ये (ICC Rankings) तीन वेगवेगळ्या मालिका खेळल्या जात आहेत. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज-इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असताना, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेचा परिणाम आयसीसीच्या ताज्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत (ICC Rankings) दिसून आला आहे.

कसोटी क्रमवारी (ICC Rankings)

कसोटी क्रमवारीत फलंदाजांमध्ये बाबर आझममुळे मोठे फेरबदल झाले आहेत. बाबर आझमने तीन स्थानांनी झेप घेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माची (rohit sharma) एका स्थानावर घसरण झाली असून तो सातव्या क्रमांकावर घसरला आहे. दुसरीकडे, विराट कोहली (virat kohli) आणि ऋषभ पंत (rishabh pant) अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. भारताच्या रवींद्र जडेजाने (ravindra jadeja) अष्टपैलूंच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकले आहे. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन (marnus labuschagne) कसोटीत पहिल्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा जो रूट (joe root) दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (steve smith)  तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने (pat cummins) अष्टपैलूंच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती करत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीच्या पहिल्या डावात त्याने नाबाद 34 धावांसह 3 बळी घेतले. त्याचा फायदा त्यांना झाला आहे.

एकदिवसीय क्रमवारी (ICC Rankings)

भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत फटका बसला आहे. एका स्थानाच्या घसरणीसह रोहित आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने टॉप 10 मध्ये स्थान मिळवले असून तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचा देशबांधव रासी व्हॅन डर ड्युसेन यालाही दोन स्थानांचा फायदा झाला असून तो आता सहाव्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने मोठी झेप घेतली आहे. त्याने आता पाच स्थानांनी प्रगती करत टॉप 10 मध्ये स्थान मिळवले असून तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह अव्वल 10 मध्ये सहाव्या स्थानावर असून तो एकमेव भारतीय आहे. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजने अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल 10 मध्ये चार स्थानांचा फायदा मिळवला आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा दहाव्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला कराची कसोटीत खराब कामगिरीचा फटका बसला आहे. तो एका स्थानाने खाली घसरला असून तो आता सहाव्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्क 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news