Manipur CM : एन. बिरेन सिंग पुन्‍हा होणार मणिपूरचे मुख्‍यमंत्री | पुढारी

Manipur CM : एन. बिरेन सिंग पुन्‍हा होणार मणिपूरचे मुख्‍यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूर भाजप विधिमंडळ पक्षाच्‍या नेतेपदी काळजीवाहू मुख्‍यमंत्री एन. बिरेन सिंग यांची निवड झाली आहे.
( Manipur CM ) हा निर्णय सर्वसहमतीने घेण्‍यात आला, अशी माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज दिली. एन. बिरेन सिंग हे दुसर्‍यांदा मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळणार आहेत. शपथविधी कार्यक्रमाबाबत अद्‍याप भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्‍यात आली नसल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Manipur CM : निर्मला सीतारमण, किरेन रिजिजू यांच्‍या उपस्‍थितीत बैठक

मणिपूर मुख्‍यमंत्रीपदाचा पेच सोडविण्‍यासाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या निवासस्‍थानी महत्‍वपूर्ण बैठक झाली होती. यानंतर आजह भाजपच्‍या केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण, किरेन रिजिजू यांच्‍या उपस्‍थितीत बैठक झाली. यानंतर मणिपूर विधिमंडळ नेतेपदी त्‍यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात आले. यासंर्भातील घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. मात्र एन. बिरेन सिंग यांच्‍या शपथविधी सोहळ्याबाबत अधिकृत घोषणा करण्‍यात आलेली नाही.

मणिपूर विधानसभेसाठी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च अशा दोन टप्‍प्‍यात मतदान झाले. भाजपला राज्‍यात ३२ जागा मिळाल्‍या आहेत. पक्षाच्‍या तब्‍बल ११ जागा वाढल्‍या आहेत. २०१७ मधील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने नॅशनल पीपल्‍स पार्टी, नागा पीपुल्‍स फ्रंट, लोक जनशक्‍ती पार्टी यांच्‍या मदतीने सरकार स्‍थापन केले होते.

हेही वाचलं का? 

 

Back to top button