शिवसेनेचं हिंदुत्व राज्यभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा; ठाकरेंचा खासदारांना आदेश | पुढारी

शिवसेनेचं हिंदुत्व राज्यभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा; ठाकरेंचा खासदारांना आदेश

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे औरंगाबाद मनपा निवडणुकीसाठी आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर एकच खळबड उडाली आहे.

राष्ट्रवादी वगळता शिवसेना आणि काँग्रेसने जलील यांच्या प्रस्तावाला धुडकावून लावले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. आज शिवसेना खासदारांना संबोधित करताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असा कडक संदेशच त्यांनी खासदारांना दिला.

आपण महाविकास आघाडीसोबत असून आपल्याला आघाडी धर्म पाळायचा आहे, मेहबुबा मुफ्ती प्रकरण विसरू नका, आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यांच्यसोबत जाणार नाही. त्यांनी त्यांच्यासोबत संसार थाटला होता आणि ते आपल्याला बोलत आहेत अशा शब्दात त्यांनी खासदारांना कानमंत्र दिला. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे एमआयएमचा प्रस्ताव निकालात काढला आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी शिवसेनेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरेंनी जोरदार मार्गदर्शन केल्याचे सांगितले. जनाब सेना म्हणणाऱ्यांनी भूतकाळ तपासून पहावा असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत प्रत्युत्तर दिले. एमआयएम आणि भाजपची हातमिळवणी केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. हे भाजपचं कारस्थान असल्याचे ते म्हणाले.

भाजपला हरविण्यासाठी एमआयएम ‘मविआ’सोबत येण्यास तयार : इम्तियाज जलील

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button