पंजाबमध्‍ये 'आप'पर्वला प्रारंभ : दहा जणांनी घेतील मंत्रीपदाची शपथ | पुढारी

पंजाबमध्‍ये 'आप'पर्वला प्रारंभ : दहा जणांनी घेतील मंत्रीपदाची शपथ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज पहिल्‍या टप्‍प्‍यात आपच्‍या १० आमदारांनीनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्‍ये एकमेव महिला डॉ. बलजीत कौर यांचा समावेश आहे.

हरपाल चीमा, डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग , डॉ. विजय सिंगला, लालचंद कटारूचक्क, गुरमीत सिंह मीत हेयर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत भुल्लर, ब्रह्म शंकर जिंपा, हजरजोत सिंग यांनी शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमानंतर सर्वांनी पंजाबमधील जनतेसह आपच्‍या नेत्‍यांचे आभार मानले. पंजाबच्‍या मंत्रीमडळात डॉ. बलजीत कौर या एकमेव महिला आहे. त्‍या आपचे माजी खासदार साधू सिंह यांच्‍या कन्‍या आहेत. मी एक महिला आणि डॉक्‍टरच्‍या रुपात राज्‍यातील महिला आणि आरोग्‍य क्षेत्राच्‍या विकासासाठी काम करणार आहोत, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

१० पैकी दोन मंत्री लखपती

आम आदमी पार्टीच्‍या १० मंत्र्यांपैकी दोघे जण लखपती आहेत. लालचंद कटारुचकक यांच्‍या कडे सहा लाख तर गुरमीम सिंह यांच्‍याकडे एकूण ४४ लाखांची संपत्ती आहे. मान यांच्‍या १० मंत्र्यांची एकुण संपत्ती ७२ कोटी आहे. चन्‍नी यांच्‍या काँग्रेस सरकारशी या मंत्रीमंडळाची तुलना केल्‍यास चन्‍नी सरकारच्‍या मंत्र्यांची एकुण संपत्ती ३८४ कोटी होती. मान सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री ब्रह्मशंकर जिंपा आहेत. त्‍यांची एकुण संपत्ती ८ कोटी आहे. तर सर्वात कमी संपत्ती लालचंद काटारुचक्‍क यांची आहे.

हेही वाचा: 

 

Back to top button