शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स १,०३९ अंकांनी वाढून ५६,८१६ वर झाला बंद | पुढारी

शेअर बाजार सावरला! सेन्सेक्स १,०३९ अंकांनी वाढून ५६,८१६ वर झाला बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क

सकारात्मक जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्सने (Sensex) आज बुधवारी (दि.१६) १,०३९ अंकांची उसळी घेतली. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स आज १.८६ टक्क्यांनी वाढून ५६,८१६ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची आजची वाढ ही १,०३९ अंकांची आहे. तर निफ्टी (Nifty) ३१२ अंकांनी वाढून १६,९७५ अंकांवर बंद झाला.

बीएसई सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्संमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर सन फार्मा आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे शेअर्स टॉप लूजर ठरले. कालच्या घसरणीनंतर आज बाजारात सुधारणा दिसून आली. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीमुळे सेन्सेक्सने उसळी घेतली असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

जागतिक स्तरावर गुंतवणूकदार बुधवारी रात्री जाहीर होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरांमध्ये वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया युद्ध आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध हे यासाठी कारण ठरू शकते, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध पेटल्यानंतर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी वाढ झाली होती. पण आता कच्च्या तेलाचे दर कमी होऊन ते प्रति बॅरेल १०० डॉलरच्या खाली आले आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button