आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु झाल्यानंतर आता १५६ देशांसाठी ई- टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरु | पुढारी

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु झाल्यानंतर आता १५६ देशांसाठी ई- टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरु

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : कोरोनाचे महामारीचे संकट नियंत्रणात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलीकडेच नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू केली आहे. तसेच आता 156 देशांसाठी लागू असलेली पाच वर्षांची ई- टुरिस्ट व्हिसा सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. शिवाय सर्व देशांच्या नागरिकांसाठी नियमित पेपर व्हिसा सुविधा देखील सुरु करण्यात असल्याचे बुधवारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारने दिलेल्‍या माहितीनुसार, 156 देशांच्या नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीची ई-टुरिस्ट व्हिसा सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षांपूर्वी ही सुविधा बंद करण्यात आली होती. मात्र आता नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू झाल्यामुळे ही सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे.

यामध्ये अमेरिका आणि जपानच्या नागरिकांना दहा वर्षाच्या कालावधीची नियमित ई-टुरिस्ट सुविधा दिली जाते, ही सुविधा देखील पूर्ववत करण्यात आली आहे. या दोन देशांच्या नागरिकांना दहा नवीन ई टुरिस्ट व्हिसा देण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा  

Back to top button