‘युक्रेनमधून २२ हजार ५०० विद्यार्थ्यांना मायदेशात आणले’ | पुढारी

'युक्रेनमधून २२ हजार ५०० विद्यार्थ्यांना मायदेशात आणले'

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सलग 20 दिवस युद्ध सुरू आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत युक्रेनमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्याबाबत विधान केले. एस जयशंकर म्हणाले की, कठीण परिस्थितीतही आम्ही आपल्‍या 22 हजार 500 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात परत आणले आहे. आम्ही सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करत आहोत. परंतु आमच्यासमोर अनेक आव्हान आहेत. तसेच आपल्‍या नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणे हे ही गरजेचे होते.

जयशंकर म्हणाले, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केली. कठीण परिस्थितीत हे एक मोठे ऑपरेशन होते. तसेच भारतीय दूतवसांनी 15, 20 आणि 22 फेब्रुवारला विद्यार्थी आणि नागरिकांना तेथून बाहेर पडण्याच्या सूचना जारी केल्‍या होत्‍या. परंतु सतत सूचना देऊनही मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथून निघत नव्हते. त्याचा अभ्यास अपूर्ण राहू नये अशी त्‍यांना भीती वाटत होती.

पुढे बोलताना ते म्हणाले, परिस्थिती बिघडली तेव्हा 18000 हून अधिक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी तेथे अडकले होते, ही बाब लक्षात घेऊन भारताबरोबरच युक्रेनमध्येही कॉल सेंटर सुरू करण्यात आले. तसेच शेजारील देशांच्या सीमेवरून ल्युकेन्स मुख्यालयातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी शेजारील देशांच्या सीमेवर पाठवण्यात आले.

जयशंकर म्हणाले की, या कारवाईदरम्यान पंतप्रधान सतत आढावा बैठका घेत होते आणि त्यावर त्‍यांचे लक्ष होते. यादरम्यान सर्व मंत्रालयांचाही पूर्ण पाठिंबा मिळाला. तेथील परिस्थिती बिघडू लागताच, जानेवारी २०२२ पासून आयुक्तांनी तिथे भारतीयांची नोंदणी सुरू केली.

हेही वाचा  

Back to top button