पिंपरीत पालिकेत प्रशासकराज ; पदाधिकार्‍यांच्या दालनास टाळे नामफलक हटविले

Administrator in Pimpri Municipality; Locked nameplate to office hall
Administrator in Pimpri Municipality; Locked nameplate to office hall
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सोमवारपासून प्रशासकराज आले आहे. पालिका बरखास्त झाल्याने महापालिका भवन व क्षेत्रीय कार्यालयातील पदाधिकार्‍यांचे दालनास टाळे लावून ती सोमवारी (दि.14) बंद करण्यात आली.

दालनावरील नामफलक काढण्यात आले. पदाधिकार्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने जमा करून घेण्यात आले असून, तेथील कर्मचार्‍यांची इतर विभागात बदली केली जाणार आहे.

मुदतीमध्ये निवडणुका न झाल्याने महापालिकेच्या सर्व 124 नगरसेवक माजी झाले आहेत. महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, सर्व गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष,

विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा, शिक्षण या विविध विषय समितीचे सभापती, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या सर्व आठ क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य, स्मार्ट सिटीचे संचालक असलेले महापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते,

स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक व मनसे गटनेते, पीएमपीएलचे संचालक असलेले महापौर व स्थायी समिती अध्यक्ष, पीएमआरडीएचे भाजप व राष्ट्रवादीचे 7 सदस्य आदी पदे रिकामी झाली आहेत. तसेच, स्वीकृत 5 नगरसेवक व क्षेत्रीय समिती 24 सदस्य हे माजी झाले आहेत.

महापालिका भवन व क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या पदाधिकार्‍यांच्या दालनांना टाळे लावण्यात आले आहेत. दालनावरील नामफलक काढून घेण्यात आले. शहरात लावण्यात आलेले पदाधिकारी व नगरसेवकांचे नामफलकही काढून घेण्यात येणार आहेत.

पदाधिकार्‍यांकडील महापालिकेची वाहने रविवारी (दि.13) रात्रीपर्यंत जमा करण्यात आली. तर, खासगी वाहन वापरणार्‍या पदाधिकार्‍यांना इंधन भत्ता या पुढे दिला जाणार नाही. पदाधिकार्‍यांच्या दालनातील सर्व लिपिक व कर्मचारी नगरसचिव विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

दोन दिवसांत त्यांना वेगवेगळ्या विभागात नियुक्तया केल्या जाणार आहेत.महापालिकेसह स्मार्ट सिटीचा कारभार आयुक्तांच्या हातात
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या एसपीव्ही कंपनीच्या संचालक मंडळात महापौर, सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचे नगरसेवक व मनसेचे गटनेते हे संचालक होते.

महापालिका बरखास्त झाल्याने स्मार्ट सिटीत आता ते संचालक नसणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आयुक्त राजेश पाटील हे स्मार्ट सिटीचा कारभार पाहतील. तसेच, केंद्राने नियुक्त केलेले सदस्य, पोलिस आयुक्त, पीएमपीएलचे अध्यक्ष व इतर संचालक असणार आहेत.

संकेतस्थळावरून नगरसेवक व समितीच्या माहिती हटविली

महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर सर्व नगरसेवकांची नावे, पक्ष व मोबाईल क्रमांकाची यादी त्यांच्या छायाचित्रासह होती. तसेच, महापौर, उपमहापौर, गटनेते विविध विषय समितीचे सभापती व क्षेत्रीय समिती अध्यक्ष अशी नावे व समिती सदस्यांची नावे होती. ती नावे व माहिती सोमवारी दुपारनंतर हटविण्यात आली आहेत.

ज्येष्ठ नगरसेवकही झाले माजी

कधीही पराभूत न होता सतत विजय प्राप्त करणारे महापालिकेत काही नगरसेवक आहेत. सलग चार, पाच आणि सहा टर्म नगरसेवक म्हणून निवडून येणारे नगरसेवक मात्र, आता माजी झाले आहेत. त्यांच्या नावापुढे आता माजी नगरसेवक लागणार आहे. महापालिका बरखास्त झाल्याने असा प्रकार घडला आहे. त्यात माजी नगरसेवक योगेश बहल, अजित गव्हाणे, मंगला कदम यांचा समावेश आहे.

प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांच्यामार्फत कामकाज सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.14) कार्यभार स्वीकारला.महापालिकेची मुदत रविवारी (दि.13) संपुष्टात आली.

महापालिका पंचवार्षिक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्तीचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला.

त्याच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महापालिकेच्या प्रशासकपदी विद्यमान आयुक्त पाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार त्यांनी प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारला.

https://youtu.be/i0BuZhAyZgw

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news