students returned from china : युक्रेनप्रमाणे चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा भविष्य टांगणीला !

students returned from china : युक्रेनप्रमाणे चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा भविष्य टांगणीला !

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमधून परतलेले हजारो वैद्यकीय विद्यार्थीच नाही तर दोन वर्षांपूर्वी चीनमधून (china) (students returned from china) परतलेल्या हजारो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्यही टांगणीला लागले आहे. कोविडच्या प्रसारामध्ये त्यांचा व्हिसा चीनने रद्द केला होता, जो अजूनही रद्द आहे. ही मुले दोन वर्षांपासून प्रॅक्टिकलशिवाय ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ते आता रस्त्यावर उतरून आंदोलन आणि ऑनलाइन मोहिमेचा अवलंब करत आहेत. चीनमधील शुल्क भारतातील कोणत्याही खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एक चतुर्थांश आहे. जागांची कमतरता, जास्त फी अशा काही गोष्टी त्यांना परदेशात जाण्यास भाग पाडतात.

हर्ष भंडारी हा उत्तराखंडचा विद्यार्थी चीनच्या (students returned from china) शमीन विद्यापीठात शिकतो. तो म्हणाला की, "सर्वांच्या प्रिय पंतप्रधानांना एकच विनंती आहे की कृपया चिनी प्राधिकरणाशी बोला. क्षी जिंगपिंग यांच्याशी बोला. जर चीनने आम्हाला बोलावले नाही तर कृपया आमच्या प्रॅक्टिकलची व्यवस्था भारतातच करा. आम्ही सर्वजण आपल्याकडून आशा करू शकतो की आपण आम्हाला मदत कराल. अनेक मुलांनी कर्ज घेऊन शिक्षण घेतले आहे. आता ते काय करतील?"

कोविडच्या प्रसारामुळे चीनने (students returned from china) फेब्रुवारी 2020 पासून परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले होते. या कालावधीत, भारतात परतलेल्या सुमारे 23,000 मुलांपैकी सर्वात मोठी संख्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रॅक्टिकलशिवाय ऑनलाइन शिक्षण घेत आहे. चीनमधील शमीन विद्यापीठात वैद्यकीय शाखेचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी हर्ष भंडारीसारखे हजारो विद्यार्थी सरकारकडे मदतीची याचना करत आहेत.

मुंबईची मेर्रयल, जयपूरचा प्रज्वल चीनमधील (students returned from china) निंगबो मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. ते सांगतात की प्रात्यक्षिक ऑनलाइनशिवाय वैद्यकीय शिक्षण शक्य नाही. त्याचबरोबर काही चायनीज अॅप्स बंद झाल्यामुळे ऑनलाईन अभ्यासातही अडचण येत आहे.

चीनच्या (students returned from china) निंगबो मेडिकल युनिव्हर्सिटीचे चौथ्या वर्षाचा विद्यार्थी प्रज्वल शर्मा म्हणाला की, "आमचे क्षेत्र हे वैद्यक क्षेत्र आहे. रुग्णाच्या जीवाला सामोरे जावे लागते. परंतु आम्ही दोन वर्षांपासून प्रॅक्टिकलशिवाय ऑनलाइन क्लासेस घेत आहोत. तसेच ज्या अॅप्सवर सैद्धांतिक वर्ग चालत होते त्यापैकी काही अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे.

तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी मेर्रयल म्हणाली, "आम्ही ऑनलाइन अभ्यास करू शकत नाही, पालकांनाही आमच्या भविष्याचे काय करायचे याची काळजी वाटते…"

चीनच्या शानडोंग विद्यापीठातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी रचिता म्हणाली, "जर सिंगापूर, मंगोलिया आणि पाकिस्तानच्या मुलांना चीन सरकारकडून उत्तर मिळू शकते, तर आम्हाला का नाही? आमची सरकारला विनंती आहे की त्यानी चीनशी चर्चा करावी.

तणावातून जात असलेली काही मुले मानसोपचारतज्ज्ञांकडेही उपचार घेत आहेत. मानसोपचारतज्ज्ञ डॉ हरीश शेट्टी म्हणाले, चीनमधून परतलेली मुले तणावाखाली आहेत. मी काही मुलांचे समुपदेशन करत आहे. सरकार त्यांना मदत करेल अशी आशा आहे.

तामिळनाडूचे समीर, हिमाचलचे गुर्जोत, दिल्लीचे लोकेश मिश्रा, मुंबईतील रचिता असे हजारो वैद्यकीय विद्यार्थी सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी दिल्लीतील चिनी दूतावासासमोर निदर्शनेही केली होती. ट्विटरवरही प्रचार सुरू आहे. दुसरीकडे, सिंगापूर, मंगोलिया आणि पाकिस्तानची सरकारे त्यांच्या देशातील विद्यार्थ्यांना परत पाठवण्याची तयारी करत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यांच्या सरकारांनी यासंदर्भात चीनशी चर्चाही केली आहे. मात्र आजतागायत भारत सरकारकडून या विद्यार्थ्यांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news