देवेंद्र फडणवीस : ‘पेन ड्राईव्ह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात दाद मागणार’ | पुढारी

देवेंद्र फडणवीस : 'पेन ड्राईव्ह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात दाद मागणार'

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेन ड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून करणार असे म्हणत आहे, पण पोलिस सरकारच्या दबावाखाली योग्य तपास करू शकणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

आम्ही पेन ड्राईव्ह प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी या मतावर ठाम आहोत. दाऊद बरोबर जवळीक असलेल्या व्यक्ती उघड्या पडत आहेत त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीसुद्धा विधानसभेत उत्तर देताना हतबल झाल्या होत्या. सरकारला आम्ही उघडे पाडत आहोत यामुळे अनेकांना त्रास होत आहे. ‘पेन ड्राईव्ह प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात दाद मागणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दाऊदची जवळीक ही जगजाहीर असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

न्यायालया संदर्भात विधानसभेत बाक वाजविणे हा न्यायालयाचा अपमान आहे. प्रविण दरेकर महाविकास आघाडीच्या विरोधात बोलत असतात त्यामुळे प्रविण दरेकरांना महाविकासआघाडी टारगेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद म्हणाले.

 

हेही वाचलतं का?

Back to top button