The Kashmir Files : मी स्वत: या हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले वास्तव

The Kashmir Files : मी स्वत: या हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी, काश्मिरी लेखकाने काश्मिरी पंडितांची माफी मागत सांगितले वास्तव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मिरी पंडितांना मारणारे आमच्याच वस्तीतील आमच्याच घरातील लोक आहेत. काश्मिरी पंडित परके नसून ते आपल्याच रक्ता-नात्याचे आणि समाजाचे आहेत. जनावरदेखील त्यांच्या समुदायातील जनावरांसोबत असे कृत्य करत नाहीत. वाघ कधीच वाघाचा शिकार करत नाही. निदान आज तरी आपल्याला या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. मी स्वत: या हत्याकांडाचा प्रत्यक्षदर्शी आहे. काश्मिरी पंडित निर्दोष होते, असे सांगत काश्मिरी लेखक जावेद बेग यांनी काश्मिरी पंडितांची (The Kashmir Files) माफी मागितली आहे.

याबाबत बेग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, आजच्या तरुणांनी ती चूक मान्य करायला हवी. तसेच बेग यांनी यासोबतच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत ते एका काश्मिरी न्यूज चॅनलशी बोलताना दिसत आहेत. यात त्यांनी काश्मिरी पंडित, काश्मिरी पंडित गिरीज टिकू आणि काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराविषयी भाष्य केले आहे. काश्मिरी मुस्लिमांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली हातात शस्त्रे घेतली, हे सत्य आहे, यात कोणत्याही प्रकारचा प्रोपोगंडा नाही. सत्य हे सत्य राहणार, कोणी मान्य करो किंवा नको. तो काळ खूप भयावह होता. त्यावेळी अनेक गुन्हे घडले होते आणि हे सगळं स्वत: पाहिलं आहे, असेही बेग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचा विषय पुढे आला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरांवर बेतला आहे. १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण या चित्रपटात केले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे भरून येत आहेत. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news