नाशिक : भावजयीला फोन करतो म्हणून धारधार शस्त्राने एकाचा खून | पुढारी

नाशिक : भावजयीला फोन करतो म्हणून धारधार शस्त्राने एकाचा खून

नाशिक : (कळवण) पुढारी वृतसेवा ; आपल्या नाशिक येथील भावजयीला फोन करत असल्याचा राग आल्याने बिजोरे ता. कळवण येथील रविंद नामदेव निकम याने पंकज मधुकर वाघ याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. कळवण पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरविल्याने अवघ्या सहा तासात आरोपीचा शोध लावून त्यास अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील बिजोरे येथील पंकज मधुकर वाघ हे (दि. १८) रात्री ११. ३० वाजता शेतात टोमॅटो पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या बिजोरे गावातील शेत मजूर रविंद्र सोनवणे यास घेण्यासाठी गेले असता परत आले नाहीत. म्हणून आई अंजनाबाई हिने नातू स्वामी यास वडिलांना भ्रमणध्वनी वरून कॉल करण्यास सांगितले. तीन चार वेळा कॉल करूनही त्यांच्याशी संपर्क न झाल्याने पंकज वाघ यांना शोधण्यासाठी वडील मधुकर जाधव, आई अंजनाबाई व मुलगा स्वामी हे गेले असता त्यांना चंदननळी ते बिजोरे गावात जाणाऱ्या रोडवर पंकज हे जखमी पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून (दि. १९)  रोजी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंकज यांचा घातपात झाल्याची तक्रार मयताच्या पत्नी वैशाली वाघ यांनी कळवण पोलिसांत दिल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षिका कांगणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर कळवणचे उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांनी वेगाने तपास चक्र फिरवीत गुन्ह्याचा अवघ्या सहा तासात छडा लावला.

मयत पंकज हे बिजोरे येथील शेत मजुरास घेण्यासाठी गेले असता त्यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, गावातील रविंद्र नामदेव निकम याने माझ्या नाशिक येथील भावजाईल का फोन करतो? तुला किती वेळा सांगितले तरी ऐकत नाही अशी विचारणा करत असताना बाचाबाची झाल्याने निकम यांनी धारदार शस्त्राने पंकज यांच्यावर वार केले. यातच पंकजचा मृत्यू झाला. कळवण पोलिसांनी रविंद्र निकम यास राहत्या घरून अटक केली असून भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे, पो. हवालदार तारू, चव्हाण, बोरसे, काॅ. बागुल करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button