नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
अवैध कोळसा खणन प्रकरणातला पैसा प्राप्त झाल्याचा गंभीर आरोप असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee ) यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने सोमवारी कसून चौकशी केली. अभिषेक हे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अवैध खणन प्रकरणातला पैसा हवाला मार्गाने बॅनर्जी यांना पोहोच करण्यात आला असल्याचा सीबीआय तसेच ईडीचा संशय आहे. चौकशीसाठी दिल्लीत दिल्लीत हजर राहण्याचे निर्देश गेल्या आठवड्यात ईडीने अभिषेक व त्यांच्या पत्नी रुजीरा यांना दिले होते. त्यानुसार अभिषेक यांनी सोमवारी चौकशीला हजेरी लावली. खाण घोटाळ्यातील अभिषेक यांची भूमिका तसेच मुख्य आरोपी अनुप मांझी याच्याशी असलेल्या संबंधाच्या अनुषंगाने ईडीने चौकशी केल्याचे समजते. भाजपवाले राजकीय हेतूने ईडी तसेच सीबीआयचा वापर करून आपल्याला प्रताडीत करीत असल्याचा आरोप दिल्लीला निघण्यापूर्वी अभिषेक यांनी कोलकाता विमानतळावर केला होता. याआधीही गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ईडीने अभिषेक यांची चौकशी केली होती.
हेही वाचलं का?