Uttarakhand election : काँग्रेसचे हरिश रावत यांची मुलगी हरिद्वार ग्रामीणमधून आघाडीवर | पुढारी

Uttarakhand election : काँग्रेसचे हरिश रावत यांची मुलगी हरिद्वार ग्रामीणमधून आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना लालकुआं मतदारसंघातून पराभवाचा सामना करवा लागत असला तरी, रावत यांच्या कन्या अनुपमा रावत उत्तराखंडमधील हरिद्वार ग्रामीण मतदारसंघ निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार अनुपमा रावत आणि भाजपचे उमेदवार राज्यमंत्री स्वामी यतीश्वरानंर यांच्यात मुख्य लढत आहे. मतमोजणीच्या ११ व्या फेरी दरम्यान काँग्रेसच्या अनुपमा रावत या जवळपास ६००० मतांनी आघाडीवर होत्या. त्यांना आतापर्यंत ४७,१८१ मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार आणि राज्यमंत्री स्वामी यतीश्‍वरनार यांना ४१, १९८ मते मिळाली आहेत.

माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास लालकुआं विधानसभा मतदारसंघातून रावत यांना नऊ फेऱ्यांनंतर २५,७४५ मते मिळाली आहेत तर, भाजपचे उमेदवार डॉ. मोहन सिंग बिश्त यांना आतापर्यंत ३९, ६३८ मते मिळाली आहेत.

हेही वाचलत का ?

 

Back to top button