Goa Election : विरेश बोरकर ठरले सर्वात तरुण आमदार | पुढारी

Goa Election : विरेश बोरकर ठरले सर्वात तरुण आमदार

पणजी: पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभा निवडणुकीत यावर्षी प्रथमच रोव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. या पक्षाचे उमेदवार विरेश बोरकर हे सांतआंद्रे मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

विरेश बोरकर हे सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. ते २८ वर्षांचे आहेत. विरेश यांनी तीनवेळा आमदार राहिलेल्या फ्रान्सिस सिल्व्हेरा यांचा प्रभाव केला आहे. सिल्व्हेरा यांच्यासाठी हा मोठा धक्कादायक पराभव ठरला आहे. आरजीला मात्र पहिल्यांच प्रयत्नात खाते उघडण्यात यश आले आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ आहे. भाजपने १९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ३ जागांवर तर आम आदमी पक्षाचा २ जागांवर विजय निश्चित आहे.

सध्याच्या कलानुसार गोवा फॉरवर्डला १ जागेवर आणि आरजेपीला १ जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

दरम्यान, भाजपने या निकालानंतर राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट मागितली आहे. सध्याचे चित्र पाहता भाजपला बहुमत मिळेल असे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत.

त्यादृष्टीने पावले टाकण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे वाळपई मतदारसंघाचे विजयी उमेदवार विश्वजित राणे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

Koo App

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी व मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार! गोव्यामधील दमदार कामगिरीने निवडणूक प्रभारी माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आपले नेतृत्त्वगुण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी व निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या मा. देवेंद्रजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Narayan Rane (@menarayanrane) 10 Mar 2022

Koo App

खूप खूप धन्यवाद गोवा ! अभिनंदन गोवेकर! गोव्यातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाला निर्विवाद कौल दिला. या देशातील जनता केवळ आणि केवळ मा. नरेंद्र मोदीजींसोबत आहे. गोव्यातील जनतेने विकासाला आणि लोकसेवेला दिलेली ही पावती आहे. #bjp #bjpwins #BJPinGoa #BJPgoa #GoaBJP #narendramodi

Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 10 Mar 2022

Back to top button