UP Election Results : सपाच्या उमेदवारांकडून दुर्बिणीद्वारे ‘ईव्हीएम’ची देखरेख | पुढारी

UP Election Results : सपाच्या उमेदवारांकडून दुर्बिणीद्वारे ‘ईव्हीएम’ची देखरेख

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाभारतात हस्तिनापूर पांडव आणि कौरवांचे युद्ध झाले. आता राजे आणि सम्राट राहिले नाहीत, पण सत्ता अजूनही आहे. हस्तिनापूरही आहे आणि गादी मिळवण्यासाठीची लढाई सुद्धा. महाभारतात विविध प्रकारचे कपट निर्माण झाले. आजच्या निवडणुकीच्या ( UP Election Results ) राजकारणात फसवणूक आणि कपट काही कमी नाही. आरोप ही अत्यंत किरकोळ गोष्ट आहे. पुन्हा एकदा हस्तिनापुरात महाभारताचाच एक डाव रंगत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या रणधुमाळीत हस्तिनापुरातील समाजवादी पक्षाचे उमेदवार योगेश वर्मा स्वतःला सध्या अर्जुन समजत आहेत. अर्जुनने ज्याप्रमाणे माशाच्या डोळ्यावर निशाणा साधला होता, त्याचप्रमाणे वर्मा यांची नजर सध्या ईव्हीएमवर मशिनवर आहे. त्यांची दृष्टी योग्य राहावी यासाठी त्यांनी दुर्बीणही बसवली आहे. यूपी निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीची सपाचे नेते योगेश वर्मासह कार्यकर्ते ईव्हीएमची देखरेख करत आहेत.

दुर्बिणीने ईव्हीएमची देखरेख ( UP Election Results )

मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार योगेश वर्मा दुर्बिणीने ईव्हीएमचे देखरेख करत आहेत. त्यांचा निवडणूक आयोग व सरकारी यंत्रणावर कदाचित भरोसा नाही. तसेच निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला पोहचू शकतील या कारणाने ते सध्या ईव्हीएमवर लक्ष ठेऊन आहेत.

देखरेखीसाठी आठ-आठ तासांची शिफ्ट ( UP Election Results )

योगेश वर्मा यांनी ईव्हीएमच्या देखरेखीसाठी मोठी यंत्रणाच उभी केली आहे. कार्यकर्त्यांची मोठी तुकडीच यासाठी तैनात केली आहे. कार्यकर्त्यांना आठ – आठ तासांची ड्युटी विभागून दिली गेली आहे. त्या द्वारे कार्यकर्त्यांची तुकडी चांगलीच देखरेख करत असल्याचे दिसत आहे.

दुर्बिणीतून काय दिसते? ( UP Election Results )

योगेश वर्मा यांना तुम्हाला दुर्बिणीतून काय दिसते असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘आम्ही दुर्बिणीद्वारे पाहत आहोत की येथे कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरु आहेत. काही अनुचीत प्रकार न घडू देणे हा आमचा या मागील उद्देश आहे.’

काय आहे प्रकरण

सपाचे उमेदवार योगेश वर्मा यांना येवढा सगळा घाट कशासाठी घातला गेला आहे असे विचारले असता ते म्हणाले, ‘इव्हीएम जेथे ठेवले आहेत त्या ठिकाणाची आम्ही छतावर आणि आजूबाजूच्या परिसरावर दुर्बिणीच्या सहाय्याने बारीक लक्ष ठेवून आहोत. ईव्हीएम मध्ये हेराफेरी केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. अशी कोणतीही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी आधीच आम्ही खरदारी घेतली आहे.

 

Back to top button