परिवहन मंत्रालय : ठराविक वाहनांसाठी ‘बीएच’सीरिजची नंबर प्लेट!

परिवहन मंत्रालय : ठराविक वाहनांसाठी ‘बीएच’सीरिजची नंबर प्लेट!
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : साधारणत: रस्त्यावर धावणाऱ्या वाहन क्रमांकावरून हे वाहन कुठल्या राज्यातील अथवा शहरातील आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दुसऱ्या राज्यातील वाहनांना रस्त्यावर धावताना सहज ओळखता येवू शकते. पंरतु, आता वाहन कुठल्या राज्यातील आहे हे सहजरित्या ओळखता येऊ शकणार नाही, असे काही 'नंबर प्लेट' जारी करण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. (परिवहन मंत्रालय)

'बीएच' म्हणजेच 'भारत' सीरीजचे हे क्रमांक केवळ केंद्र सरकार अथवा ज्या खासगी कंपनींची कार्यालये किमान चार किंवा त्याहून अधिक राज्यात असतील,अशा कंपनीत कार्यरत वारंवार बदलीची शक्यता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. दुसऱ्या राज्यातील वाहन क्रमांक बघून वाहतूक पोलिसांकडून नाहक त्रास होणार नाही. तर दुसऱ्या राज्यात बदली झाली तरी संबंधितांना वाहन क्रमांक त्या राज्यातही मान्य राहील, असे दुहेरी फायदे या नवीन वाहन क्रमांकाच्या 'सीरीज'मुळे होतील.

'व्हीआयपी' क्रमांक जारी केले जाणार नाहीत

चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांसाठी देखील या सीरीजचे क्रमांक देण्यात येतील.असे असले तरी या सीरीजकरिता 'व्हीआयपी' क्रमांक जारी केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्रालय याच्या या निर्णयामुळे बराच दिलासा मिळेल, असे मत परिवहन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, केंद्र तसेच राज्य सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी क्षेत्रातील कंपनी तसेच संघटनांचे स्वामित्व असलेल्या खासगी वाहनांसाठी या सीरीजची सुरूवात केली आहे. या सीरीजची नंबर प्लेट पांढरीच राहणार असून त्यावर काळ्या रंगाने क्रमांक लिहिला जाईल.

नंबर प्लेटवर सर्वात अगोदर वर्ष लिहिली जाईल. वाहन २०२२ मध्ये नोंदणी झाली असेल तरी सर्वात अगोदर २२ लिहिले जाईल, त्यानंतर बीएच लिहिले जाईल. यानंतर चार अंकी क्रमांक लिहिला जाईल. संबंधित वाहन मालकाला दोन वर्ष अथवा दोन-दोन वर्षाच्या हिशोबाने पथकर भरावा लागेल. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल.

एवढा आकारला जाईल पथकर!

या सीरीजकरिता मंत्रालयाने १० लाखांपर्यंत किंमत असलेल्या वाहनांसाठी ८ टक्के, १० ते २० लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी १० टक्के आणि २० लाखांहून अधिक किंमतीच्या वाहनांसाठी १२ टक्के पथकर निश्चित केला आहे. डिझेल वाहनांसाठी अतिरिक्त २ टक्के शुल्क आकारला जाईल तर इलेक्ट्रिक वाहनांवर २ टक्के कमी कर आकारला जाईल, असे मंत्रालयाकडूने स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news