युक्रेनमधील सुमी शहरावर रशियाचा एअर स्ट्राइक, दोन मुलांसह ९ ठार | पुढारी

युक्रेनमधील सुमी शहरावर रशियाचा एअर स्ट्राइक, दोन मुलांसह ९ ठार

सुमी; पुढारी ऑनलाईन

रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. दरम्यान, युक्रेनमधील सुमी शहरावर झालेल्या हवाई हल्ल्यात ९ जण ठार झाले. यात दोन मुलांचा समावेश असल्या माहिती बचाव पथकाने दिली आहे. सुमी शहर हे युक्रेनची राजधानी कीव्ह पासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर आहे.

सोमवारी रात्री रशियन विमानांनी नागरी वस्त्यांतील इमारतींवर हल्ला केला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने येथील जीवितहानीची माहिती दिली आहे. सुमी शहराजवळील रशियन सीमेजवळ गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरु आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील कीव्ह, चेर्निहीव्ह, सुमी, खार्किव्ह, मारियुपोल या ५ शहरांत मानवतावादी कॉरिडॉरसाठी तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली होती. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून (मॉस्को वेळेनुसार) या शहरांत मानवतावादी कॉरिडॉर खुला केला जाईल, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेले निवेदनात म्हटले आहे.

युक्रेनची (Ukraine Russia War) राजधानी कीव्हवर रशियाने ताबा मिळविल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे काय होईल, याची चर्चा सुरू झाली आहे. रशियन शार्प शूटर्सपासून झेलेन्स्की यांच्या बचावासाठी अमरिकेने प्लॅन बी तयार केला आहे. युद्धाला सुरवात होऊन १२ दिवस उलटले तरी रशियन फौजा अद्याप झेलेन्स्कींपर्यंत पोहचू शकलेल्या नाहीत.

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यादरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाचा आजचा १३ वा दिवस आहे. दरम्यान, युक्रेनियन सशस्त्र दलाचे कमांडर व्हॅलेरी झालुझनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने कीव्ह जवळ रशियन विमान पाडले. एवढेच नाही तर रशियाच्या मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना खार्किव्ह जवळ गोळ्या घालून ठार केले.

Back to top button