UP Exit Poll : 'द पॉलिटिक्‍स'च्‍या एक्‍झिट पोलने अखिलेश यांच्‍या चेहर्‍यावर फुलवले हास्‍य | पुढारी

UP Exit Poll : 'द पॉलिटिक्‍स'च्‍या एक्‍झिट पोलने अखिलेश यांच्‍या चेहर्‍यावर फुलवले हास्‍य

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (UP Exit Poll ) साेमवारी जाहीर झाले. विविध वृत्तवाहिन्‍या आणि  संस्‍थांनी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, एक ते दोन अपवाद वगळता अन्‍य एक्‍जिट पोलमध्‍ये उत्तर प्रदेशमध्‍ये पुन्‍हा एकदा भाजप सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्‍यात आला आहे. मात्र आणखी एका एक्‍झिट पोलने समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्‍या चेहर्‍यावर हास्‍य फुलवले आहे.

‘द पॉलिटिक्‍स डॉट इन’चा एक्‍झिट पोल जाहीर

एक्‍झिट पोल जाहीर झाला आहे. यामध्‍ये अखिलेश यादव यांच्‍या समाजवादी पार्टीला २३८ जागा मिळतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. भाजपला १५७ जागा मिळतील, असे भाकीत करण्‍यात आले आहे. बसपला ६ तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल, असाही अंदाज या एक्‍झिट पोलमध्‍ये व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे.

UP Exit Poll समाजवादी पार्टीला ४१ टक्‍के मतदान

‘द पॉलिटिक्‍स डॉट इन’चा एक्‍झिट पोलनुसार २०१७ विधानसभा निवडणुकीच्‍या तुलनेत भाजपच्‍या मतांचा टक्‍का घटणार आहे. २०१७ मध्‍ये उत्तर प्रदेशमध्‍ये भाजपला ३९.६७ टक्‍के मते मिळाली होती. यंदाच्‍या निवडणुकीत हा आकडा ३२ टक्‍क्‍यांवर येणार आहे. तर समाजवादी पार्टीच्‍या मतांचा टक्‍का हा २१.८२ वरुन ४१ टक्‍क्‍यांपर्यंत जाण्‍याचा अंदाज आहे.

देशबंधुच्‍या सर्वेनुसार समाजवादी पार्टीला मिळणार २२८ ते २४४ जागा

देशबंधुने केलेल्‍या सर्वेनुसार, उत्तर प्रदेशमध्‍ये समाजवादी पार्टीला यंदा २२८ ते २४४ जागा मिळू शकतात. तर भाजपला १३४ ते १५० जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेसला १ ते ९, बसपा १० ते २४ जागा मिळतील, असाही अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

समाजवादी पार्टीला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील : अखिलेश यादव

सत्ताधारी भाजपला सत्ताबाह्य करण्‍यासाठी राज्‍यातील जनतेने मतदान केले आहे. त्‍यामुळे यंदा समाजवादी पार्टीला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्‍वास अखिलेश यादव यांनी व्‍यक्‍त केला आहे. त्‍यांनी ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे की, ‘सातव्‍या आणि मतदानाच्‍या अंतिम टप्‍प्‍यात समाजवादी पार्टी आणि आघाडीला बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल. सर्व मतदारांचे विशेषत: तरुणाईचे विशेष आभार. आम्‍ही उत्तर प्रदेशमध्‍ये सरकार स्‍थापन करणार आहोत’.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button