नाशिक : म्हशींना घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक ; दोघे दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी

नाशिक : म्हशींना घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक ; दोघे दुचाकीस्वार जागीच ठार

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; नामपूर रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

नामपूर रस्त्यावर  निळगव्हाण फाट्याजवळ आज मंगळवारी ( दि. 8) सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  या अपघात दुचाकीस्वार बापू शिवा मानोर (५५) व पप्पू बापू मानोर (२५) दोघे रा. टिपे हे जागीच ठार झाले.

नामपूरकडून मालेगावच्या दिशेने म्हशींची वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एक्स ६६८६) ने समोरुन येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिली. गंभीर मार लागल्याने दोघे दुचाकीस्वार जागेवरच ठार झाले. दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. दरम्यान ट्रक चालक घटना स्थळावरून पसार झाला असून पुढील तपास वडनेर खाकूर्डी पोलिस करत आहे.

हेही वाचा ;

Back to top button