'ऑपरेशन गंगा' : पंतप्रधान मोदी यांनी आठव्यांदा घेतली उच्चस्तरीय बैठक | पुढारी

'ऑपरेशन गंगा' : पंतप्रधान मोदी यांनी आठव्यांदा घेतली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युध्दग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी हाती घेण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.४) रोजी आढावा घेतला. युक्रेन संकटावर गेल्या काही दिवसांत मोदी यांनी घेतलेली ही आठवी उच्चस्तरीय बैठक आहे.

युध्दग्रस्त युक्रेनमध्ये काही दिवसांपूर्वी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तर ताज्या घटनेत एका विद्यार्थ्याला गोळी लागली असल्याचे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी सांगितले होते. युक्रेन संकटाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेंन्सकी तसेच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करीत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन गंगा’ राबविली जात आहे. याचाच आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी चार केंद्रीय मंत्र्यांना पूर्व युरोपमधील विविध देशांत रवाना केले आहे. युक्रेनला लागून असलेल्या या देशांच्या मार्गे विद्यार्थ्यांची सुटका केली जात आहे. लष्कराच्या सी – १७ विमानांची मदत सुटकेसाठी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button