COVID-19 Update : देशातील दैनंदिन कोरोना संसर्गदर १ टक्क्याच्या खाली | पुढारी

COVID-19 Update : देशातील दैनंदिन कोरोना संसर्गदर १ टक्क्याच्या खाली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात गुरूवारी (दि.3) दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत (COVID-19 Update) सौम्य घट नोंदवण्यात आली.  बुधवारी (दि.२) ७ हजार ५५४ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात ६ हजार ५६१ कोरोनाबाधित आढळले. यामध्ये पूर्वीपेक्षा घट नोंदवण्यात आली. गेल्या एका दिवसात १४२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. तर, १४ हजार ९४७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६२% नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.७४% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.९९ टक्के नोंदवण्यात आला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची (COVID-19 Update) संख्या त्यामुळे ४ कोटी २९ लाख ४५ हजार १६० पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २३ लाख ५३ हजार ६२० रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ७७ हजार १५२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १४ हजार ३८८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात कोरोनाविरोधात ((COVID-19 Update) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७८ कोटी २ लाख ६३ हजार २२२ डोस देण्यात आले आहेत. यातील २१ लाखांहून अधिक डोस बुधवारी दिवसभरात देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत २.०२ कोटी बूस्टर डोस दिल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १७८ कोटी ४८ लाख १४ हजार २०० डोस पैकी १५ कोटी १९ लाख ६ हजार २३६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ७७ कोटी ५० हजार ५ इतक्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ८२ हजार ९५३ तपासण्या बुधवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

व्हि़डिओ पहा : वादळाची चाहूल | Pudhari Podcast

हेही वाचलत का ?

Back to top button